Mumbai News : लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप गुलदस्त्यात आहे. यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दावा केला आहे. आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपला मिळू लागली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची महायुतीकडे इच्छा केली व्यक्त केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, “भाजप आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली ती काही फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सामील झाला म्हणून नव्हे तर आम्ही सुद्धा भाजपमध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्र पक्षाला सुद्धा आंबेडकरवादी मतं पूर्वी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपला मिळू लागली”, असा दावा आठवले यांनी केला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने याचा विचार करावा आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला एक जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरपीआयचे योगदान...
महायुतीच्या आतापर्यंतच्या यशात आरपीआयचे मोठे योगदान असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. आंबेडकरवादी मतं मिळवून देण्यात आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. “भाजपने आणि एकूणच आमच्या एनडीएने अब की बार 400 पार ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुद्धा मोठं योगदान आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणूक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे”, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
...तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही
रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या जागेची मागणी महायुतीकडे केली आहे. ही मागणी महायुतीने मान्य करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. याबाबत ते म्हणाले, “अशोक चव्हाण आता भाजपा सोबत आले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा सुद्धा महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने आम्हालाही एक जागा द्यावी. महायुतीने आमच्या RPI पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही”.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.