Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेचे राज ठाकरे यांनी रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावर सत्ताधारी भाजपकडून जोरदार टीका केली आहे. या जाहीरनाम्यावर टीका करताना भाजप नेते व मंत्री आशिष शेलार म्हणाले, प्रसिद्ध केलेला हा वचननामा नव्हे तर अपचननामा आहे, अशा शब्दांत हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाभवन येथे करण्यात आले. 'शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द' अशी त्यांच्या जाहीरनाम्याची टॅगलाईन आहे. या वचननाम्यावर पत्रकार परिषद घेऊन मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले, ठाकरे बंधूनी या वचननाम्यातून केवळ मोठमोठे आश्वासन दिले आहेत. मात्र, हे आश्वासन नागरिकांच्या पचनी पडण्यासारखे नाही आहेत. त्यामुळे हे ऐकल्यानंतर नागरिकांना अपचन होण्यास सुरवात होते. त्यामुळे हा ठाकरे बंधूनी प्रसिद्ध केलेला हा वचननामा नव्हे तर अपचननामा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेने (Shivsena) केलेल्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा भाजपकडून येत्या काळात जनतेसमोर आणला जाणार आहे. भाजपकडून त्यांचा कारभार चव्हाटयावर आणला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या भुलथापाला बळी न पडता मतदारानी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहवे, असे आवाहन यावेळी आशिष शेलार यांनी केले.
दरम्यान, मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर सडकवून टीका केली. त्यांचा महापौर झाला तर महाराष्ट्रचा पाकिस्तान होईल. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे मारामारी करतात, त्यामुळे संस्कृती खालावत आहे. मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे. येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकणार असून महायुतीचा महापौर बसणार आहे. पुढील वर्षी गणपतीला हे दिसणार नाहीत, दिवाळीला एकत्र दिसणार नाहीत. मराठी माणसासाठी 25 वर्षात उद्धव मामुने केलेले एक तर काम दाखवावे, आम्ही 10 काम दाखवतो. बीडीडी चाळीत आम्ही लोकांना घर दिले. तुम्ही मातोश्री दोन बनवले, अशी टीका साटम यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.