Nationalist Congress Party leader Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal Thanked The State Government : भुजबळांनी मानले सरकार अन्‌ चंद्रकांतदादांचे आभार; म्हणाले, ‘हे यश आपल्यासाठी खूप महत्वाचे...’

Savitribai Phule Award News : भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही.

Vijaykumar Dudhale

Mumbai Political News : आरक्षण आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनाम्याच्या बातमीने गेली काही दिवस प्रकाशझोतात असणारे राज्याचे अन्न व नागारी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकार विशेषतः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत. 'कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार' या पुरस्काराचे नाव बदलून आता "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. तसेच, पुरस्काराची रक्कमही वाढवली आहे. (Chhagan Bhujbal thanked the state government)

राज्य सरकारने आपल्या मागणीला प्रतिसाद देत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला भगिनींना दिला जाणाऱ्या 'कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार' या पुरस्काराचे नाव बदलून आता ते ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. तसेच, यापूर्वी या पुरस्काराची रक्कम ही २५ हजार रुपये होती.

त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पुरस्काराची रक्कम आता एक लाख रुपये असणार आहे. आपल्या मागणीला आलेले हे यश खूप महत्वाचे आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (Bhujbal Thanked To Govt )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ म्हणाले, सामाजिक समता, स्त्री शिक्षण, कमकुवत गटातील मुला-मुलींचे शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये निरलसपणे आणि सेवावृत्तीने कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

दुर्दैवाने प्रतिसादाअभावी गेल्या १० वर्षांपासून सरकारकडून हा पुरस्कार बंद करण्यात आला होता. परंतु आपल्या मागणीनंतर नुकताच हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आपल्या वरील दोन्ही मागण्याही सरकारकडून मंजूर करण्यात आल्या आहेत.

पुनरुज्जीवित करण्यात आलेला हा पुरस्कार देऊन आता राज्यातील महिला भगिनींना पुन्हा एकदा सन्मानित करण्यात येणार आहे. ही आपल्यासाठी नक्कीच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आरक्षणावरून कलगीतुरा सुरू आहे. त्यातच भुजबळांनी याच मुद्यावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही, त्याचीही चर्चा रंगली असताना सरकारने सावित्रीबाई फुले पुरस्काराचे नाव बदलत पुरस्काराची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेऊन भुजबळांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT