Pattankadoli Sarpanch News : पट्टणकोडोलीच्या सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न, हाताची नस कापून घेतली

Bhagyashree Koli's Suicide Attempt : इतक्यावरच न थांबता कोळी यांनी स्वतःला संपवण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Bhagyashree Koli
Bhagyashree KoliSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लोकनियुक्त महिला सरपंचाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे त्यांना तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. (Suicide attempt of Sarpanch of Pattankadoli Gram Panchayat)

भाग्यश्री दत्तात्रय कोळी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सरपंचांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला. राजकीय दबावातून त्यांनी हे पाऊल उचलेले की आणखी कोणते कारण त्यामागे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhagyashree Koli
Pandharpur Corridor : ‘पंढरपूर कॉरिडॉर होत असताना स्थानिकांनी वातावरण दूषित करणारे विषय काढू नयेत’

याबाबतची माहिती अशी की, पट्टणकोडोली येथील सरपंच भाग्यश्री कोळी या विकास नगर येथे राहतात. ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामे संपवून त्या शनिवारी आपल्या घरी आल्या होत्या. त्यावेळी घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे होते. मात्र, शनिवारी सायंकाळी भाग्यश्री कोळी यांनी राहत्या घराच्या खोलीची आतून कडी लावून हाताची नस कापून घेतली.

इतक्यावरच न थांबता कोळी यांनी स्वतःला संपवण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घरातील लोकांनी जाऊन पाहिले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी घरातील इतर लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांना खाली उतरवून कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Bhagyashree Koli
Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा शिरूर मतदारसंघ अजित पवारांच्या रडारावर, भूमिपूजन अन्...

आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. गावातील अनेकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. सरपंचांनी उचललेल्या या पाऊलाची गावात चर्चा सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Edited By : Vijay Dudhale

Bhagyashree Koli
Bacchu Kadu Warning To BJP : बच्चू कडूंचा भाजपला कडक इशारा; ‘आधी विधानसभेचं बोला; मगच लोकसभेसाठी आमच्याकडे या’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com