Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीसह आता महायुतीतील घटक पक्षांनी देखील दौरे, बैठका, मेळावे यांनी चांगलाच वेग पकडला आहे. एकीकडे भाजपने एकापाठोपाठ बैठकांचा धडाका लावला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट)देखील आक्रमक झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. मुख्यमंत्री येत्या 6 जानेवारीपासून संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदेंनी लोकसभा निवडणुकीसाठीचा मेगा प्लान ठरवला. यात त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला टप्पा हा 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात ते वाशिम,यवतमाळ आणि रामटेक या ठिकाणी 6 जानेवारीला पदाधिकारी मेळावा घेणार आहे. यानंतर 8 जानेवारीला ते अमरावती, बुलढाणा, 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशिव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पुढे 11 जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर, 21 जानेवारी रोजी शिरूर आणि मावळ, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्गमध्ये 24 ला असणार आहे. शिर्डी आणि नाशिकला ते 25 जानेवारीला रोजी शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. या त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये हुंकार भरला जाणार आहे.
शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे फक्त 60 दिवसच उरले असल्याचेही ते म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचेच नाहीतर अवघ्या देशाचे लक्ष आपल्यावर असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Loksabha Election 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिंदे म्हणाले, महायुतीचे टार्गेट 45 प्लस आहे, ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही. आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करायचे आहे. ही जागा लढली,ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून,सोशल मीडियातून येतील. पण आपण 48 जागा महायुती म्हणून लढायचं आहे अशी भूमिकाही मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत मांडली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.