Raju Patil and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

MNS Raju Patil News : नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुख्यमंत्र्यांना विसर ; आमदार राजू पाटलांचं शिंदेंना ‘आगरी’ भाषेत पत्र !

Navi Mumbai Airport News : '' आपण नेहमी दिल्लीत जातात. आपल्याला आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही...''

Deepak Kulkarni

Dombivali : नवी मुंबईतील विमानतळाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली होती. नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त संघर्ष पेटला. अखेरच्या एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या काही तास आधी ठाकरे सरकारने देखील नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांच्या नावाचा ठराव करत वादावर पडदा टाकला.

यानंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने देखील ठाकरे सरकारचा निर्णय कायम ठेवला. पण मुख्यमंत्र्यांना नामांतराच्या मुद्द्याचा विसर पडला असून मनसे(MNS)चे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आगरी भाषेत पत्र लिहिलं आहे.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. विधी मंडळात दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, विधी मंडळाने मंजूर केलेला ठराव केलेल्याला वर्ष उलटून गेले तरी अद्याप केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही.

यावरुनच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना भूमिपुत्रांच्या आगरी भाषेत तडाखेबाज असे पत्र लिहिले आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र लढा देत आहेत. याविषयीच्या प्रस्तावास विधानसभेत मंजुरी मिळाली असतानाही केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यास मात्र विलंब होत आहे. यावरुन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नाराजी बोलून दाखवली आहे.

मनसे नेते राजू पाटील(Raju Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिपुत्रांच्या आगरी भाषेत पत्र लिहिले आहे. या पत्रात पाटील आगरी भाषेत मुख्यमंत्र्यांना म्हणाले, आपण नेहमी दिल्लीत जातात. आपल्याला आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही. भरले गारीला सूप जर नसंत अशा शब्दात त्यांनी आगरी म्हणीचा वापर करुन निशाणा साधला आहे.

तसेच विमानतळाच्या नामांतराला विलंब कोणामुळे होतो माहीत नाही. मात्र, आम्हा समाजबांधवाना "हाती जेला ना शेपुट रला असा दिसाला लागलात. परत आमचे बांधवांचे कालजाला इंगोल (विस्तव ) पेट झेल ना आमची उगाच ओरातन नको. आवरीच नम्र इनंती करासाठी यो पत्रप्रपंच." असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

25 ऑगस्ट 2022 रोजी आपून इधानसभेर जाहीर केलता की नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय इवानतलाला लोकनेते दि.बा.पाटील ह्यांचे नाव दिला जावाला लागणारा परस्ताव केंद्र सरकारचेकर पाठवला जाल. यो परस्ताव इधानमंडलाचे दोनी सभागुरहान मांडून मान्यता बी मिलाली तरीबी आजुक तो परस्ताव केंद्र सरकारचेकर पाठीला जेला नय. हा विलंब करण्याचे मार्ग, 'चालते गारीला खील लावाचा कोनचा क हेतू आसल माइती नाय.

पून ज्या नेत्याचे मुलं शेतकऱ्यांच्या जनिमी रल्या अशे लोकनेते दि.बा.पाटील ह्यांचे नाव इवानतलाला मिलावा याचेसाठी समाज बांधवावी 'आंगाचा तिलपापर' करुनशा उभारलेला 'शांततापूर्ण' लढा आपून बगला ना येकूनच समाजबांधवांच्या भावना कती तीव्र हात या अनुभवूनशा मुसलाला कोम फुटावा तसा आपून लोकनेते दि.बा.पाटील यांचा नाव न देवाचा आपला हट्ट मागे झेतला. त्याचे बद्दल तुमचा कवतुक करावा तवरा कमीच ह. शिवाय कई बी झला तरी आगरी कोळी समाज बांधवाच्या भावनांना तुम्ही आलवा देऊन कोवला नी कारु शकत नाय ह्याची सगळ्यांनाच खात्री ह.

''भरले गारीला सुप जर नसतं...''

न तरीबी ज्या कई चालले त्यान 'ताकाला जावून भांडा लपवाचा' काम चालले का असा उगाचच संशय मनात येते. कोनीबी जर क आगरी-कोळी समाजाचे टोंडाला पानी पुसाचा इचार करीत आसल तर आपुन त्याला तडाखेबंद जाब इचराल यान शंकाच नाय, नय तर बाराभाईची शेती लागल क हाती? असा नको होवाला. ज्यांच्यावं जबाबदारी ह त्यावी पुढाकार झेवाला कुचराई केली असल त आपून आवरे येला दिल्लीला जाता, येखाद येलेला आम्हा समाजबांधवाची ही फाईल नेवाला पका कई जर (जड) जाल असा वाटत नाय कारन 'भरले गारीला सुप जर नसतं.

दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी बगाची छाती पुरं करून ओर आगरी कोळी बांधवांना लागले, हाती जेला ना शेपुट रला असा दिसाला लागला त परत आमचे बांधवांचे कालजाला इंगोल (विस्तव ) पेट झेल ना आमची उगाच ओरातन नको. आवरीच नम्र इनंती करासाठी यो पत्रप्रपंच असं पत्रात आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT