CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Drivers Strike : चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्र सरकारशी चर्चा

Shinde Discuss To Gadkari : संपामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो, त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

शर्मिला वाळुंज

Dombiwali News : राज्यातील ट्रक आणि टॅंकर चालकांनी संप पुकारला आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा साठा संपण्याच्या भितीने अनेकांनी पंपावर गर्दी केली आहे. तसेच, राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. राज्य सरकार केंद्रासोबत चर्चा करून त्यातून समन्वय साधून योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. (Chief Minister Shinde's discussion with Nitin Gadkari regarding the drivers' strike)

हिट ॲंड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक आणि टॅंकरच चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल याच्यासह शेतीमाल, दूध वाहतुकीवरही दिसू लागला आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था सध्या ठप्प झाली आहे. त्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकारने हिट ॲंड रन कायद्याच्या माध्यमातून घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ देशभरातील चालकांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपामध्ये टँकरचालक सहभागी झाल्याने राज्यात होणारा इंधनपुरवठा सोमवार पासून ठप्प झाला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील अनेक पेट्रोल पंप दुपारीच बंद करण्यात आले आहेत.

याविषयी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारशी बोलणे सुरू आहे. आम्ही देखील त्याठिकाणी पाठपुरावा करू. हा संप लवकरात लवकर कसा मिटेल आणि त्यातून मार्ग कसा निघेल, हे पहिले जाईल. कारण जर इंधनचा पुरवठा झाला नाही तर यामुळे मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राज्य सरकार केंद्रासोबत योग्य समन्वय साधून मार्ग काढला जाईल.

Edited By -Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT