Madha Loksabha : तुमचं मिटत नसेल तर मी माढ्यातून लढतो; जगतापांची मोहिते-पाटलांना गुगली

Mohite Patil Meet Jaywantrao Jagtap : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेले पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जगताप यांची भेट घेतली.
Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Karmala News : तुमचं मिटत नसेल तर मी भारतीय जनता पक्षाकडून खासदारकी लढतो, असे वक्तव्य माजी आमदार तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेले पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जगताप यांची भेट घेतली. त्या भेटीत जगताप यांनी आपणही माढ्यातून इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. (I will contest from Madha Lok Sabha constituency from BJP: Jaywantrao Jagtap)

धैर्यशील मोहिते-पाटील यांची ही भेट जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजपच्या उमेदवारी घेऊन माढ्यातून लढतो, असे विधान केले असले तरी भविष्यात जगताप पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे हे संकेत आहेत.

Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Maharashtra Politics महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी

जयवंतराव जगताप हे 1990 व 2004 असे दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते. मात्र, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यांनी 2019 मध्ये निवडणूक न लढवता आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे संजय शिंदे यांना आमदार करण्यात जगताप यांचा मोठा वाटा आहे. ते 1990 पासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत, काही काळ त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Pandharpur News : लग्नमंडपातून वरातीऐवजी निघाली वरपित्याची अंत्ययात्रा; डीजेचा दणदणाट जिवावर बेतला

सध्या जयवंतराव जगताप हे आमदार संजय शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांची नुकतीच भाजपच्या सोलापूर जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी जिल्हाभर भाजपचे काम सुरू केले आहे.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून धैर्यशील मोहिते-पाटील खासदारकी लढवण्याची तयारी करत आहेत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील हे दोघेही भाजपकडून इच्छुक आहेत. खासदार निंबाळकर यांना पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास आहे, तर दुसरीकडे माझ्या नावाचाही विचार होऊन उमेदवारी मिळेल, अशी आशा मोहिते-पाटील यांना आहे.

Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Truck Drivers Strike : ट्रक चालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते-पाटलांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र, खासदार झाल्यानंतर निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात दरी पडत गेली. भाजपकडून सध्या मोहिते-पाटीलही माढा लोकसभा मतदारसंघावर दावा करीत आहेत. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील आणि जयवंतराव जगताप यांच्या भेटीत भाजपच्या ध्येयधोरणावर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर चर्चा झाली. दरम्यान, माढा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर चर्चा झाली.

Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Bharat Gogawle: मर्द असतील तर चमत्कार दाखवा; गोगावलेचं राऊतांना खुलं आव्हान

या भेटीवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले आहे. तसेच, मोहिते-पाटलांचेही योगदान मोठे आहे, हे नाकारता येणार नाही. भाजप 2024 मध्ये ज्याला उमेदवारी देईल, त्यांचाच आपण प्रचार करणार आहे. मात्र, मोहिते-पाटील-निंबाळकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटणार नसेल तर माझ्या नावाचा विचार करा. मी सर्वांना चालणारा उमेदवार आहे. माजी आमदार जगताप यांच्या या वक्तव्यावर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मितहास्य करून शांत राहणे पसंत केले.

Edited By-Vijay Dudhale

Jaywantrao Jagtap-Dhairyasheel Mohite Patil
Hit And Run Act : 'हिट अँड रन' भाजपासाठी 'अॅक्सिडेंट स्पाॅट'...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com