congress mla meeting Sarkarnama
मुंबई

Congress News : काँग्रेस विधिमंडळ बैठकीला 36 आमदार उपस्थित, तर 'हे' 7 आमदार अनुपस्थित

Maharashtra Congress News : तीन मोठे नेते पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

Jui Jadhav

शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचे ( Congress ) आमदार फुटीच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे तीन मोठे चेहेरे महायुतीत सत्तेत सामील झाल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ( 15 फेब्रुवारी ) काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. तसेच, दोन दिवस काँग्रेस आमदारांचं लोणावळ्याला शिबिर आयोजित केलं आहे, पण आज बोलावलेल्या बैठकीला काही आमदार अनुपस्थितीत राहिले आहेत.

मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अन्य आमदारही सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे 36 आमदार उपस्थित होते, तर 7 आमदार अनुपस्थित राहिले आहेत. पक्षातून अजून आमदार बाहेर पडू नये, यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोणावळ्यातील शिबिरात सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच, आमदारांचं नेमकं म्हणणं, त्यांची अपेक्षा, काँग्रेसची पुढील भूमिका शिबिरात स्पष्ट केली जाणार आहे. राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना निवडून आणण्यासाठी आमदारांना सांगितलं जाणार आहे.

"काँग्रेस पक्षाच्या ताकदीची जाणीव भाजपला करून देण्याची वेळ आली आहे. भाजपनं चौथा उमेदवार दिला, तरीदेखील आमचा उमेदवार जिंकेल," असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला.

'हे' आमदार बैठकीला गैरहजर

  • मोहनराव हंबर्डे

  • माधवराव जवळगेकर

  • जितेश अंतापूरकर

  • अमित देशमुख

  • के. सी. पाडवी

  • संग्राम थोपटे

  • सुलभा खोडके

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT