Dapoli News : दापोलीत विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना अन् राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला धक्का, पण...

Shivsena Dapoli News : दापोली नगरपंचायतीतील अजितदादांचा एक बडा नेता ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून राजकीय सल्ला घेत असल्याची चर्चा आहे. म्हणून...
Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dapoli Political News : राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवारांची ( Ajit Pawar ) राष्ट्रवादी व भाजप हे एकत्र महायुतीत आहेत. पण, दापोली नगरपंचायतीमध्ये मात्र वेगळे चित्र गेले अनेक महिने पाहायला मिळत होते.

या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी व शिंदे गट एकत्र येत ठाकरे गटाला दणका दिला. तरी महायुतीमधील नेत्यांच्या आदेशाची ही केवळ औपचारिकता उरकण्यात आल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Konkan Politics: दापोली नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला दणका; महायुतीचे वर्चस्व

दापोलीत ठाकरे गटाला नगरपंचायतीच्या विषय समित्यांमध्ये दणका देण्यात आला. पण, अजितदादांच्या राष्ट्रवादी नगरसेवकांचे स्टेटस कोरेच दिसत आहेत. त्यामुळे शिंदेंची ( Eknath Shinde ) शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अद्याप मनोमिलन झाले नसल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.

विषय समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या शिंदे गट आनंदात असला तरीही अजितदादांची राष्ट्रवादी सोशल मीडियावरही या आनंदात सहभागी नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ औपचारिकता पूर्ण करत ठाकरे गटाला बाजूला ठेवल्याची चर्चा सध्या दापोलीत उघडपणे सुरू आहे.

Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Sunil Tatkare : गितेंना पाडणारा भाजपचा नेता म्हणतोय, यंदाच्या निवडणुकीत रायगडमधून तटकरेंचा कडेलोट करायचाय !

दापोली नगरपंचायतीतील अजितदादांचा एक बडा नेता ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून राजकीय सल्ला घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विषय समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिंदे गटाला स्थान देण्यात आलं आहे.

तरीसुद्धा उपनगराध्यक्षपदाचा कोणताही धक्का लावण्यात आला नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांचा गट नाराज होऊ नये, याची काळजी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घेण्यात आल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Raigad Loksabha 2024 : रायगड लोकसभेवर भाजपचा दावा पण शिंदे गटाचा आमदार म्हणतोय; यंदाही तटकरेच खासदार...!

राष्ट्रवादीतील महिला आघाडीच्या एक ज्येष्ठ नेत्या सोशल मीडियावर सक्रिय असतात, पण विशेष निवडणूक झाल्यानंतर याची एकही पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नव्हती. या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत झालेला बदल ही केवळ नेत्यांच्या आदेशानं औपचारिकता उरकण्यात असल्याची चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे.

Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Loksabha Election 2024 : कोकणात लोकसभा उमेदवारीवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस; उदय सामंतांनी पुन्हा केला दावा

दोन वर्षांपूर्वी दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे नगरसेवक यांची आघाडी होती. ही आघाडी आणि आमदार योगेश कदम यांच्यात थेट सामना झाला होता. पण, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) हे तीनही पक्ष सत्तेत एकत्र आलेत.

मात्र, अजित पवार गटात गेलेल्या नगरसेवकांचा अद्याप आमदार योगेश कदम (Yogesh Kadam), त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर जुळलं नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Uddhav Thackeray | Ajit Pawar| Eknath Shinde
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपचा पहिला खासदार होण्याची प्रमोद जठारांची इच्छा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com