Pankaja Munde-Fadnavis Meeting : Devendra Fadnavis And Pankaja Munde News Sarkarnama
मुंबई

BJP Candidate List: राज्यातील भाजप उमेदवारांच्या यादीवर फडणवीसांचा वरचष्मा; घेतली 'ही' काळजी

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : लोकसभा निवडणुकीतील 72 उमेदवारांची दुसरी लिस्ट भाजपने बुधवारी (ता.13) सायंकाळी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील वीसजण आहेत. राज्याच्या या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठसा ठळकपणे जाणवत आहे.

महाराष्ट्राच्या व भाजपच्याही पहिल्या महिला मुख्यमंत्री 2024 ला होणार अशी चर्चा असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता या शर्यतीतून अचूकपणे कट करण्यात आला आहे. तो करताना एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले आहेत. त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्या जागेवरच त्यांना उभे करण्यात आले.

त्यातून दिल्लीत त्यांना पाठवून मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या इच्छेला किमान 5 वर्षे ब्रेक लावण्यात आला. प्रीतम यांची उमेदवारी कायम ठेवून पंकजांना दुसरीकडून ती देऊन मुंडे बहिणींची ताकद डबल होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

पंकजा यांना खासदारकीची उमेदवारी देऊन मराठवाड्यातील ओबीसी नेता दिल्लीला पाठविण्यात आला. तशीच खेळी विदर्भातील दुसरे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबतीत खेळण्यात आली आहे. तेही मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील दुसरा ओबीसी चेहरा होते. त्यांनाही मुख्यमंत्रिपदाच्या मार्गातून दूर करण्यात आले आहे. दुसरीकडे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना मात्र महाराष्ट्रातच ठेवले गेले आहे.

पहिल्या यादीत वीसपैकी फक्त चार खासदारांचा पत्ता कट करून बंड होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. वीसमध्ये फक्त चार चेहरे नवीन आहेत. पण, ते बदलताना काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने ती तेथे कायम ठेवली आहे.

खासदार प्रीतम मुंडेंच्या (Pritam Munde) जागी बीडमध्ये त्यांची बहीण पंकजा यांना, तर अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्या जागेवर त्यांचा मुलगा अनुप यांना तिकीट देण्यात आले आहे.

पु्ण्यातून राज्यसभेवर ब्राह्मण चेहरा (मेधा कुलकर्णी) नुकताच देण्यात आल्याने मराठा मतांसाठी मराठा उमेदवार (मुरलीधर मोहोळ) देण्याची चाल देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खेळली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गतवेळी 2019 ला राज्यातून भाजपचे 23 खासदार निवडून गेले होते. या वेळी ते 31 जागा लढविण्याच्या विचारात आहेत. त्यातून विद्यमान खासदारांची खासदारकी शाबीत राहिली आहे. मात्र,आता बाकीच्या 11 जागा जाहीर करताना युतीतील शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून संक्रात येण्याची शक्यता आहे. त्यातून शिवसेनेत स्फोटही होऊ शकतो. आपल्या 13 खासदारांना तिकिटे मिळाली नाही, तर त्यांची समजूत काढताना एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नाकीनऊ येणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT