Dharashiv Loksabha News : धाराशिव शिवसेनेचा उमेदवार ठरला ? मुख्यमंत्री शिंदे, माजी खासदार गायकवाड यांची भेट

Eknath Shinde - Ravindra Gaikwad Meeting : ठाकरे गटाकडे असलेले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्याची संधी मिळावी, असे प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहेत.
Eknath Shinde Dharashiv
Eknath Shinde DharashivSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता कोणत्याही क्षणी केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.13) मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. हे घेत असतानाच शिंदे यांनी शिवसेनेने दावा केलेल्या जागांचा मॅरेथाॅन आढावाही घेतला. 

मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारा संदर्भात मुख्यमंत्री शिंदे, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

Eknath Shinde Dharashiv
Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे-पवार गट भिडले !

या बैठकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार फायनल झाल्याचेही सांगितले जाते. राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 40 आमदारांसह 13 खासदारांनीही पाठिंबा दर्शवला होता. या सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, व राज्यातील भाजप नेत्यांकडे आग्रह धरत आहे. 

या शिवाय ज्या मतदारसंघामध्ये शिवसेना यापूर्वी लढली आहे, त्या जागाही आपल्यालाच म्हणजे खऱ्या शिवसेनेला मिळाव्यात, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडे असलेले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्याची संधी मिळावी, असे प्रयत्न शिंदे यांच्याकडून सुरू आहेत. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिवमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्याशी दोन हात करायला शिंदे शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक नेते तयार आहेत. यात प्रामुख्याने माजी खासदार रविंद्र गायकवाड, पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नावे समोर येत आहेत. महायुतीचे राज्यातील जागावाटप अंतिम टप्यात असून कुठल्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते. 

भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली असून यात धाराशिवचा समावेश नाही. त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाला (Shivsena) सुटल्याची जोरदार चर्चा आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बंद दाराआड चर्चेत कोणाच्या नावाची लाॅटरी लागली हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde Dharashiv
Nanded Loksabha Election News : भाजपला चिखलीकरांचीच गॅरंटी, आता अशोक चव्हाणांची परीक्षा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com