Devendra Fadnavis-Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

Ambadas Danve BJP Entry News : दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. दानवेंच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही

Vijaykumar Dudhale

Mumbai, 30 March : गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवसेना पक्ष सोडण्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडाखेबंद उत्तर दिले. ‘तुम्ही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंशी चर्चा करत आहात. पण, आम्ही ऑपेरशन केले, तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर समजायचं की ऑपरेशन नाही. त्यामुळे दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. दानवेंच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे अंबादास दानवे यांच्या शिवसेना सोडण्याची चर्चा रंगली आहे. त्यातच संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना जाहीर केली आहे, त्यामुळे दानवे हे नाराज असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरमधून अंबादास दानवे यांनीही ठाकरेंकडे लोकसभेचे तिकीट मागितले होते. मात्र, ठाकरेंनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दानवे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा होत आहे. त्यावर भाजपकडून खुद्द फडणवीसांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणारा मराठवाड्यातील मोठा नेता कोण आहे, हे मलाही सांगा. जो नेता मीडियात माहिती आहे, पण मला माहिती नाही, असा हा मोठा नेता कोण आहे. पण, मराठवाड्यातील मोठ्या नेत्याने (अर्चना पाटील) प्रवेश केलेला आहे. याव्यतिरिक्त आज तरी दुसरा कोणता मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करेल, अशी परिस्थिती नाही, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात जो भूकंप आम्ही करणार आहोत, असं सांगितलं जात आहे. तो भूकंप काय आहे, ते तरी आम्हाला सांगा. कोणाविषयी चर्चा सुरू आहे, हे आम्हालाही सांगा. त्यात एखादं चांगलं नाव असेल तर आम्हीही त्यांचा पाठपुरावा करू. पण, निवडणुकीत काही प्रवेश होत असतात. कमी अधिक भूकंप होत असतात. आज तरी असं कोणी नाही. तुम्ही ज्यांच्याशी चर्चा करत आहात, त्यापैकी कुणीही नाही.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT