Dharashiv Loksabha Election - Dhananjay Sawant  Sarkarnama
मुंबई

Dharashiv Loksabha: धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट; तानाजी सावंतांच्या पुतण्याचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन

Tanaji Sawant Political News : शिवसेना शिंदे गट धाराशिवसाठी अचानक आक्रमक झाला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय यांनी थेट उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाकडे धाव घेतली आहे.

Pankaj Rodekar

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघावरुन महायुतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीने खेचून आणली. यानंतर येथे ठाकरेंच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात भाजप आमदार राणा जगजीतसिंहांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करुन दिल्यानंतर त्यांना उमेदवारीही बहाल केली आहे.

आता यानंतर शिवसेना शिंदे गट धाराशिवसाठी अचानक आक्रमक झाला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय यांनी थेट उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानाकडे धाव घेतली आहे. हजारो समर्थकांना घेऊन सावंत मुंबईकडे निघाले होते.

धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतुन उमेदवारी मिळावी या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटण्याची वेळ दिली आहे. तो मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने मिळावा ही कार्यकर्त्यांची आग्रही मागणी असल्याचे कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिवमधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला दिल्यानंतर धनंजय सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी बाहेर दाखल झाले आहेत. तसेच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साडेनऊ वाजता भेट होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे धाराशिव (Dharashiv Loksha Election) जागेचा तिढा सोडवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा पारंपारिक मतदार संघ शिवसेनेचा असल्याने तो आपल्याकडे लावा यासाठी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलो आहे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे तसेच शंभर टक्के मतदारसंघ राखण्यात यश येईल असा विश्वासही यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT