Param bir Singh's suspension reversed
Param bir Singh's suspension reversed sarkarnama
मुंबई

Param Bir Sinh News : महाविकास आघाडीने निलंबित केलेल्या परमबीर सिंहांना शिंदे-फडणवीसांचे रेड कार्पेट; काय आहे कारण ?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि अँटिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील संशयित आणि जवळपास 5 प्रकरणांमध्ये आरोपी असलेले परमबीर सिंह यांचं निलंबन अखेर शिंदे फडणवीस यांनी मागे घेतलं आहे. सिंह यांच्या निलंबन मागे घेण्यावरुन आगामी काळात सत्ताधारी विरोधक यांच्यात नवीन वाद पेटण्याची निर्माण होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह( Param Bir Singh) यांनी मुंबईचे ४३ वे पोलीस आयुक्त म्हणून २९ फेब्रुवारी २०२० मध्ये पदभार स्वीकारला होता. ते १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

मात्र, मुंबई पोलीस आयुक्त असताना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीचं पत्र ठेवल्याची घटना २५ घडली. यानंतर मुंबई पोलिसांकडून याचा तपास सुरू असतानाच गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी सापडला. यावरून झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर दोन्ही गुन्ह्यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्याकडे घेतला.

एनआयएने मुंबई पोलीस दलातील गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे (सीआययु) तत्कालीन प्रमुख आणि वादग्रस्त चकमक फेम अधिकारी सचिन वाझे याला अटक केली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आयुक्त पदावरून गृहरक्षक दलामध्ये तडकाफडकी बदली केली.

आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi Government)ने सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्फोटक पत्र लिहून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखेचे वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंना 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. परमबीर सिंह यांच्याविरोधात 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी गोरेगाव पोलीस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.

महाविकास आघाडी सरकारनं 2 डिसेंबर 2021 रोजी परमबीर सिंह यांचं निलंबन केलं होतं. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन DG होम गार्ड या पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी सिंह यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांना फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज केला.परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. त्यानंतर वाळकेश्वर आणि जुहू येथील घराबाहेर नोटीस लावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटीस जारी करून 6 डिसेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

‘फरार’घोषित करण्याचा आदेश केला रद्द

न्यायालयाने परमबीर सिंह यांना ‘फरार’घोषित करण्याचा आदेश केला रद्दमुंबई : खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची मुंबई पोलिसांना परवानगी देणारा आदेश मुंबई न्यायालयाने मागे घेत परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला होता.

काय आहेत आरोप?

अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात अकोल्यातील निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करणाऱ्या भाईंदर येथील विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी परमबीर सिंग आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी दुसरा गुन्हा दाखल केला होता.

तसेच ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात सिंह आणि इतर चार आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्यापारी केतन तन्ना यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे येथील नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हॉटेल व्यावसायिक आणि नागरी कंत्राटदार बिमल अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे परमबीर सिंग, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर तिघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

आयुक्तपदावरून हटवल्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्फोटक पत्र लिहून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखेचे वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंना 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा धक्कादायक आरोप केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सिंह यांच्या या आरोपानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT