Mumbai News : सर्वोच्च न्यायालयात काल (दि.११ रोजी) एकीकडे महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निवाड्याबाबबत सर्वात मोठी घडामोड घडत होती. तर त्याचवेळी निकाल येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवण्यात आली होती. यामुळे राजकीय वर्तुोळात एकच चर्चा रंगली होती. मात्र जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ मागून घेतला आहे.
आयएल अॅण्ड एफएस या कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिता झाल्याचा ठपका ठेवला ईडीकडून ठेवला आहे. यानंतर या कंपनीशी संबंधित सर्वांना नोटीस बजावण्यात आली होती. याच कंपनीच्या संबंधी २०१९ या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ही ईडीने नोटीस बजावण्यातआली होती. त्यानुसार राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली होती.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याच कंपनीच्या संबंधाने ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी १२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बोलवण्यात आले आहे. परंतु आपले काही वैयक्तिक काम असल्याने जयंत पाटील यांनी ईडीकडून वेळ वाढवून मागितले आहे.
दरम्यान या नोटीशीबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "आयएल अॅण्ड एफएस या संस्थेशी माझा कसलाही संबध नाही. मी या कंपनीकडे कधी कर्ज मागणयासाठीही गेलो नाही. मात्र मला नोटीस आले आहे. मात्र, मी चौकशीला सामोर जाईन. पण आता काही जवळच्या लोकांची लग्नाचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे बोलविण्यात आले तारखेपेक्षा दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईन, असे पत्र मी ईडीला दिले आहे."
"ईडी नेमकं नोटीस का पाठवते असते? हे आता संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे ही नोटीस मला आत्ताच का पाठवली गेली ? याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण आपल्याला का लक्ष्य करण्यात आले? हे मला समजत नाही," असे ही जयंत पाटील (Jayant patil) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.