Rahul Narvekar and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : शरद पवारांचं टेन्शन वाढलं; आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे-नार्वेकरांची भेट

Sharad Pawar, Rahul Narwekar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेवर साडेचार वाजता निकाल

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन गुरुवारी साडेचार वाजता करणार आहेत. तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नार्वेकरांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना आमदार अपात्रेच्या निकालावेळीही अशा भेटीमुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यावेळी निकालाच्या दोन दिवस आधीच नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली होती. न्यायाधीशांच्या भूमिकेत असलेल्या नार्वेकरांनी आरोपींच्या पिंजऱ्यातील व्यक्तीची भेट घेतली, असा थेट आरोपच विरोधकांनी केला होता. यामुळे सेटलमेंटचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नार्वेकरांनी आपल्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतल्याचे सांगितले. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) नार्वेकरांची कोंडी केली होती. मतदारसंघातील कामांबाबत आजपर्यंत कधी भेटले नाहीत, मग निकालाच्या मुहूर्तावरच त्यांना आपल्या मतदारसंघाची आठवण कशी झाली, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला होता. यातून विरोधकांनी नार्वेकरांना घटनात्मक पदाचा दर्जा राखण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेना अपात्रतेचा निकाल लागला. विधिमंडळातील संख्याबळ लक्षात घेऊन खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, तर शिवसेनेच्या कुठल्याही गटातील आमदार अपात्र केले गेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्र याचिकेवर सुनावणीचा निकाल लागणार आहे. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नार्वेकरांची (Rahul Narwekar) भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता नार्वेकर राष्ट्रवादी अपात्रतेचा काय निकाल देणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT