Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : लग्न एकाशी, संसार दुसऱ्याशी, हनिमून...; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray : ठाकरेंनी अहंकारामुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचे काम केले.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : शिवसेना पळवणारे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा राजकीय वध करणार, असा निर्धार करीत नाशिकच्या अधिवेशनातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनीही सडेतोड प्रत्युत्तर देत ठाकरेंचा समाचार घेतला. ज्यांनी निवडणुका एका पक्षाशी लढवून, सत्तास्थापनेसाठी दुसऱ्या पक्षासोबत गेले त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या नेत्यांसह जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'वधाची भाषा वापरणाऱ्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी. आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेबांनी आयुष्यभर दूर ठेवले त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी त्यांनी मांडीवर घेतले. त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. राज्यातील लोकांच्या विश्वासाला धोका दिला. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनिमून तिसऱ्याबरोबर, असे धंदे ज्यांनी केले, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.'

रामाच्या रुपात फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे निवडणुकीत फाडणार, अशी टीकाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. त्यावर शिंदे म्हणाले, 'राम कोण आणि रावण कोण, हे सर्व जनतेला माहिती आहे. रावणाच्या लंकेचे दहन कुणी केले, हे सर्वांना माहिती आहे. अहंकारी रावणाचे राज्य गेले. त्यामुळे अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये. राज्याचे हित लक्षात घेऊन काम केले पाहिजे. आपल्या अहंकारामुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे लोकांना माहिती आहे, की रामाची वृत्ती कुणाची आणि रावणाची वृत्ती कुणाची, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'ठाकरेंच्या अहंकारामुळे महाराष्ट्र राज्य मागे गेले. त्यांचा रामावर विश्वास नाही. त्यांनी राम मंदिराला विरोध केला. त्यामुळे जो राम का नही, वो किसी काम का नही. विकासासाठीच आम्ही सत्ता पालटवली. आता राज्यातील सर्व प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी पाठिंबा देत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, हेच बाळासाहेबांना अभिप्रेत होते. त्यांनी दुसऱ्यावर टीका करताना आत्मपरीक्षण करावे. त्यांनी लोक का सोडून जात आहेत, याचा विचार करावा. सत्तेच्या खुर्चीसाठी त्यांनी पूर्णपणे व्यभिचार केला, त्याचेच ते फळ भोगत आहेत,' असा घणाघातही शिंदेंनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT