Arvind More Shivsena Leader Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच धक्का; मोदींच्या व्यासपीठावर 'जागा' न दिल्याने बड्या नेत्याचा 'जय महाराष्ट्र...'

Arvind More Shivsena Leader : कल्याणमधील मतदान अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शिंदे गटाला आपल्या बालेकिल्ल्यातच जोरदार धक्का बसला आहे.

Chetan Zadpe

Kalyan Dombivli News : एकिकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे पक्षांतरं, पक्षप्रवेश आणि नाराजीनाट्य सुरुच आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने शक्ती पणाला लावली असताना मुख्यमंत्री शिंदे यांना जबरदस्त धक्का बसलाआहे.

शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. उद्धव ठाकरे यांचे शिलेदार मानले गेलेले मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल धाले होते.

नुकतेच कल्याण येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर आपल्याला स्थान मिळाले नाही, व्यासपीठावर आपल्याला बसवण्यात आले नाही, यामुळे त्यांनी शिंदेंना रामराम केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोरेंच्या राजीनामा पत्रात काय?

अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात ते म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत आपल्याला उचित मान दिले गेले नाही.

माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. माझ्याच हाताखाली आमदार विश्वनाथ भोईर व त्यांच्यासह सर्वच पदाधिकारी काम करत असतात. मात्र त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. मात्र आम्ही पक्षासाठी अहोरात्र काम करत असतो. मात्र आम्हाल व्यासपीठावर जागा दिली गेली नाही. मग माझ्या पदाचा काय उपयोग?"

कोण आहेत अरविंद मोरे ?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एक प्रमुख शिलेदार मानले गेलेले अरविंद मोरे यांनी शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल झाले. कल्याणच्या भागात ते चागलेत सक्रिय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्राकांत शिंदे यांच्या प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात ते नेहमीच प्रयत्नशील राहिले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र आता कल्याणमधील मतदान अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शिंदे गटाला आपल्या बालेकिल्ल्यातच जोरदार धक्का बसला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT