Mumbai, 13 March : वारंवार सूचना देऊनही मंत्री आणि सचिव विधानसभेत उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसेजर’च्या माध्यमातून मांडला. विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे या काँग्रेस आमदारांनीही आव्हाडांच्या सुरात सूर मिसळत सभागृहा स्थगित ठेवण्याची मागणी केली. विरोधी आमदारांच्या मदतील ज्येष्ठ आमदार सुधीन मुनगंटीवारही धावून येत आमदारांचा मुद्दा योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी मंत्री, सचिव सभागृहात उपस्थित नसल्याचे सांगून विधानसभेचे कामकाज दहा दिवसांसाठी स्थगित ठेवले, त्यामुळे मंत्री, सचिवांच्या गैरहजेरीमुळे सभागृह स्थगित ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, विरोधी पक्षाचे लोक आम्ही काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटलो होतो. त्यांनीही आमच्याशी गांभीर्याने चर्चा केली आहे. अनुदानाच्या मागण्या जेव्हा चर्चेला येतील, तेव्हा सत्ताधारी बाकावर काही जबाबदारी मंत्री उपस्थित असले पाहिजेत. नगरविकास हा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे, मात्र त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी एक मंत्री नाही. सामाजिक न्याय विभागाचा एक मंत्री नाही...गृहनिर्माण एक मंत्री नाही... पर्यटन मंत्री नाही... इतर मागास विकास विभागाचा एकही मंत्री नाही. सरकार चालवायचं की आहेत चला...येतात....जातात. हे काय चालू आहे?, असे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले.
विरोधी बाकावरील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), विकास ठाकरे यांनीही आव्हाडांच्या सुरात सूर मिसळत दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा, अशी मागणी केली.
तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी निरोप पाठवला आहे, मंत्री येत आहेत, असे सांगून कामकाज पुढे चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाड यांनी नाही नाही असं चालत नाही. मंत्री अनुस्थित राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, असे सांगितले.
त्यावर सभागृहात उपस्थित पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्ष महोदय मी आहे, आदिती तटकरे आहेत. आम्ही मुद्दे लिहून घेत आहोत. सामुदायिक जबाबदारी आहे. विधान परिषदेत काही मुद्यांवर चर्चा सुरू आहे, असे सांगून सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार हे विरोधकांच्या मदतीला धावून आले.
ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा कामकाजाच्या दृष्टीने महत्वाचा आणि योग्य आहे. मंत्री बैठकांमध्ये व्यस्त असले तरी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी या चर्चेत बोलणाऱ्या सदस्यांच्या नोंदी घेणे, त्यासंदर्भात योग्य कार्यवाही आणि अंमलबजावणी करणे अपेक्षित असते.
मंत्री बैठकीत असू शकतात. पण सचिव नसणे हे कामकाजाच्या दृष्टीने आपल्या सर्वांना विचारपूर्वक निर्णय करणे अपेक्षित आहे. अन्यथा सभागृहाची धार कमी होईल. सदस्यांचा अवमान होईल किंवा सभागृहातील सदस्यांचा चर्चेत केवळ अरुण्यरुदन राहील, त्यामुळे तुमच्यासारखा सज्जन अध्यक्ष लाभल्याने मंत्र्यांना निरोप द्यावा आणि सचिवांना उपस्थित राहण्याचा नियम करावा, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.
खातेनिहाय मागण्यांवर चर्चा होत असताना सभागृहात मंत्री आणि सचिव उपस्थित राहावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याची सूचना केली आहे, तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सचिवांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. तरीही सचिव उपस्थित राहत नसतील तर गंभीर आहे, असा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी मांडला. त्यावर तालिका अध्यक्षांनी हे विधानसभा दहा मिनिटांसाठी स्थगित ठेवण्यात येत असल्याचे घोषित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.