Meera Borwankar- Ajit Pawar- Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan News : आधी बोरवणकरांच्या आरोपांची 'फायरिंग'; आता तत्कालीन CM पृथ्वीराज चव्हाणांचा 'बॉम्ब'

Meera Borwankar Allegations against Ajit Pawar : " सत्तेतील त्यावेळचा मित्रपक्ष असलेल्या..."

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह राजकीय वर्तुळातून या आरोपांवर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

याचदरम्यान,अजित पवारांनी स्वत: मंगळवारी पत्रकार परिषद घेत बोरवणकरांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, आता या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी नवा 'बॉम्ब' टाकला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मीडियाशी संवाद साधला. पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर भाष्य केले. यात त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, मीरा बोरवणकर यांची पोलिस आयुक्तपदावरून बदली करताना प्रोटोकॉलप्रमाणे माझ्या कार्यालयातील कुणीतरी त्यांच्याशी संपर्क केला असेल, असं ते म्हणाले होते.

चव्हाण म्हणाले, बोरवणकरांना पुण्यातच गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी होती, पण तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बोरवणकरांच्या बदलीला विरोध केला होता. सत्तेतील त्यावेळचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधामुळे त्यांची ‘सीआयडी’मध्ये बदली करता आली नव्हती, असा धक्कादायक खुलासा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला आहे.

मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत माझे कुटुंब पुण्यात होते. म्हणून ‘सीआयडी’चे प्रमुखपद रिक्त असून, मला ते दिले जावे, अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना केली होती, असे म्हणाल्या होत्या. पण त्यांनी ‘आघाडी धर्म पाळावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला विरोध आहे , असे चव्हाण यांनी बोरवणकर यांना सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांनी आरोप फेटाळले...

माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी(Ajit Pawar) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळले आहे. ते म्हणाले, दिवंगत आर. आर. पाटील हे गृहमंत्री होते. मी पालकमंत्री होतो, पण मी फक्त आढावा बैठक घेतली होती.

त्या बैठकीत मी त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला आणि त्यांनी नाही असे उत्तर दिल्यावर तो विषय तिथेच संपला. कामे रखडू नयेत म्हणून आढावा घेत असतो, पण आढावा घेतला म्हणजे निर्णय बदलला असे होत नाही. या प्रकरणात माझी कुठलीही सही नाही. पुस्तकात इतरही गोष्टी आहेत, मग माझ्यावरच फोकस कशासाठी, असा सवालही उपस्थित केला.

बोरवणकर यांचा नेमका आरोप काय?

माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केलेल्या काही उल्लेखामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना येरवडा इथली मोक्याची तीन एकर जागा ही जागा पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली होती.

तत्कालीन राज्य सरकारने पुणे पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली होती. माझ्याकडे कार्यभार असल्याने जमिनीवरील ताबा सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेस मला देण्यात आले. अजित पवार यांनीही यासाठी आग्रह धरला होता. येरवड्यातील ही जागा एका बिल्डरला देण्याचा निर्णय झाला होता, पण मी आयुक्त झाल्यानंतर ही जागा देण्यास विरोध केला.

" मॅडम, तुम्ही यात पडू नका..."

या जागेत पुणे पोलिसांचे कार्यालय आणि याच ठिकाणी पोलिस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ही जागा पुणे (Pune) पोलिसांची आहे, भविष्याच्या दृष्टीने ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असे मी त्यांना सांगितले. पण सर्व प्रक्रिया झाली आहे, त्यामुळे तुम्ही फक्त जागा हस्तांतरित करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

त्यावर सगळी प्रक्रिया झाली आहे, तर मग माजी आयुक्तांनीच जागा हस्तांतरित का केली नाही, असा प्रश्न मी विचारल्याचेही बोरवणकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याचवेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मॅडम, तुम्ही यात पडू नका, असे सांगितल्याचे बोरवणकरांनी या वेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT