Anil Parab Vs Yogesh Kadam sarkarnama
मुंबई

Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

Yogesh Kadam Controversy : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

Amit Ujagare

Yogesh Kadam Controversy : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. कदम फॅमिली तोडपाणी करणारी गँग असून ठिकठिकाणी छापेमारी करुन हे लोक काय करतात हे टप्प्याटप्प्यानं मी बाहेर आणणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

तोडपाणी करायची जुनी सवय

परब म्हणाले, "रामदास कदम यांच्या कुटुंबाकडून छापेमारी केल्याचं दाखवलं जातं आणि नंतर तोडपाणी केलं जातं. ही कदम कुटुंबाची जुनी सवय आहे, आम्ही याला तोडपानी गँग म्हणतो. म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडं भरपूर प्रताप आहेत, हे टप्प्याटप्प्यानं आम्ही बाहेर काढू. प्रदुषण मंडळात किती रेड झाल्या? त्या रेडचं पुढे काय झालं? चाकणमध्ये रेड झाली त्याचा त्यांना अधिकार होता का? त्यांच्या वैधतेचाही प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी घेतो"

पहिला विषय हाच की रामदास कदम सातत्यानं सांगत आहेत, माझ्या बायकोची बदनामी केली. पण खरंतर तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपल्या बायकोच्या नावे असे बार उघडून त्या ठिकाणी बायका नाचवता. शरम वाटली पाहिजे, महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही. योगेश कदम तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, तुम्हाला या गोष्टीची लाज लाटते तर मग अशी कृत्ये कशासाठी करता? असा सवालही यावेळी अनिल परब यांनी केला.

जगबुडी नदीतील वाळू उपसा

दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. या नदीच्या बाबतीत मी आरोप केला होता की, ६७ किमीची जगबुडी नदीबाबत गाळ आणि वाळू उपसा करायचा जो काही उपक्रम आहे. त्यात फक्त १०० ते १५० मीटर पर्यंत गाळ उपसला जातो. सरकारनं आपल्या पैशानं उपसलेला गाळ शेतकऱ्यांना दिला पाहिजे असा नियम आहे. वाळू असेल तर नव्या नियमानुसार शेतकऱ्याला घरबांधणीसाठी त्याला ५ ब्रास वाळू दिली पाहिजे. पण इथली सगळी वाळू ही योगिता डेन्टल महाविद्यालयाच्या आवारात टाकली आहे. हे कॉलेज गृहराज्यमंत्र्यांच्या बहिणींच्या नावानं आहे.

या महिवाद्यालयाच्या आवारात वाळूचे ढिगारे आहेत. जर ही वाळू कोणी घेऊन जात नाहीतर ती तुमच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये का आहे? तुम्हाला याची गरज काय? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. ही गाळमिश्रीत वाळू आहे ती नंतर चाळली जाते, त्यातून वाळू आणि गाळाची माती वेगळी केली जाते आणि त्यानंतर यांचे चट्टेबट्टे ती विकून टाकतात. बिपिन पाटणे हा कोण शेतकरी आहे? कदम हा कोण शेतकरी आहे? म्हणजे जिथं जिथं वाळू पडली आहे, त्याला जिओ टॅग लावून आम्ही ड्रोन सर्व्हे करुन त्याचा व्हिडिओ मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडं देणार आहे.

शिवतेज आरोग्य सेवा संघटना हा ट्रस्ट आहे, या ट्रस्टचं योगिता डेन्टल कॉलेज आहे. या ट्रस्टमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची आई आहे, बहिण आहे, भाऊ आहे ते स्वतः आहेत. त्यामुळं उपसा केलेली वाळू, डान्सबार हे Conflict of Interest या सदराखाली मोडतात. यांनी असं जाहीरही केलेलं नाही की माझे या घराशी काही संबंध नाहीत. मी या घराशी संबंध तोडलेले आहेत. कुठलीही पेपर नोटीस दिलेली नाही. उलट रामदास कदम यांनी काल मोठं भाषण केलं की, माझी दोन्ही मुलं कशी कर्तुत्ववान आहेत, ही त्यांची कर्तुत्व आहेत, याचा त्यांना अभिमान आहे.

घरातल्या नोकरला दगड खाणीचं कॉन्ट्रॅक्ट

तिसरा विषय म्हापरन गावातील महादेव नाला याचं उत्खनन करण्यासाठी अकीब मुकादम या माणसानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं, पालकमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलं आणि योगेश कदम यांनाही त्यानं गाळ काढण्याच्या परवानगीसाठी पत्र दिलं. अख्ख्या महाराष्ट्रात एकाच माणसाला गाळ स्वतःच काढायचा आणि त्याची विल्हेवाट लावायचं काम दिलं. हे महसूल मंत्र्यांच्या आदेशानं दिलं. पण या महादेव नाल्याच्या ऐवजी त्यानं सावित्री नदीतील गाळ काढला.

हा अकीद मुकादम कदम कुटुंबियांच्या घरातील नोकर माणूस आहे. त्यानंतर दगड आणि जांभा याच्या उत्खननात महसूल मंत्र्यांकडून शासनाची करोडो रुपयांची रॉयल्टी बुडली आहे. ज्यांना हे उत्खनन करायला परवानगी दिली आहे हे त्यांचे खास लोक आहेत. यातही किती उत्खनन झालंय याचा अहवाल अद्याप आलेला नाही कारण यात राज्यमंत्र्यांचा दबाव आहे. याचे पुरावे मी आता मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT