Mumbai News : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा काही दिवसांपूर्वी मोठ्या वादात सापडला होता. कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त भाष्य केलं होतं. शिवसेनेच्या नेत्यांना नडणारा आणि मुंबई पोलिसांना चकवा देणारा कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वादळी पत्रकार परिषदेआधी कामरानं चार शब्दांचं ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई पोलिसांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला चारवेळा समन्स बजावल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयानं त्याला अटकेपासून दिलासा दिला होता. पण काहीकाळ सोशल मीडियापासून दूर राहिलेला कामरा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करताना भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवलं आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी दोन लोकं मला भेटली होती. त्यांनी 160 जागा जिंकून देतो अशी गॅरंटी दिल्याचा खलबळजनक दावा केला होता. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर टार्गेट केलं आहे.
याचदरम्यान, कॉमेडियन कुणाल कामरा याने उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी(ता.11)च्या पत्रकार परिषदेआधीच अवघ्या चार शब्दांचंच ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. कामरा यानेही ट्विटमधून निवडणूक आयोगावर टीकेची बाण सोडला आहे.
कुणाल कामरानं (Kunal Kamra) पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यानं आतानिवडणूक आयोगालाच लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. कामरा यानं 7 ऑगस्टलाच निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवताना खोचक टोला लगावला होता. त्यावेळी त्यानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची 'द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया' म्हटलं होतं.
आता कुणाल कामरानं पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्याने चार शब्दांचं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं 'इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया' चा थेट 'इलेक्शन कॉम्प्रोमाईज ऑफ इंडिया' असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि निवडणुकीविषयी धक्कादायक आरोप केले आहेत. यात त्यांनी भाजपाच्याच एका नेत्यानं ईव्हीएम हॅक करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवल्याचा दावा करत खळबळ उडवली आहे. यावेळी त्यांनी संबंधित नेते आता नेते नाहीत, असंही म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना बिहारमध्ये मतदान यादीतील वगळलेल्या नावांची यादी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला मागितल्यांचंही सांगितलं. मात्र, वगळलेली नाव देणं आम्हाला बंधनकारक नाही, असं निवडणूक सांगत असेल तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान असल्याचंही ठणकावलं.
तसेच सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे आहेत की काय? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी व्हीव्हीपॅटवच्या रिसीटची मोजणी कधीच झाली नाही. सिम्बॉलिक मोजणी झाली. आता व्हीव्हीपॅटही काढलं. निवडणूक आयोग एक एक निर्णय आपल्या मर्जीने घेत असल्याचा आरोपही केला. याचवेळी निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत का?, असा संतप्त सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.