NCP Sharad Pawar Political News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : लोकसभेच्या प्रचारासाठी शरद पवारांचा 'मेगा प्लॅन'; 22 दिवसांत घेणार तब्बल 50 सभा

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन बरोबर महिना उलटला आहे.भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.याच धर्तीवर शरद पवारांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार Sharad Pawar यांनी यंदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे दिसून येत आहे.अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पवारांनी बंडखोरांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावतानाच त्यांना पाडण्याचा इरादाच बोलून दाखवला होता.त्याची सुरुवात आता लोकसभेच्या निवडणुकीतून होणार आहे. (Losabha Election 2024)

शरद पवारांनी आपला पाच ते सहा दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावला असून एक एक पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे.त्यातच अजित पवारांच्या Ajit Pawar निकटवर्तींयांसह भाजप,शिवसेनेत नाराजांकडे विशेष मोर्चा वळवला आहे.याचसोबत आता पवार राज्यात लोकसभा निवडणुकासाठी सभांचा धडाका लावणार आहे.अवघ्या 22 दिवसांत राज्यभरात तब्बल 50 सभा ते घेणार आहेत.शरद पवारांनी बंडखोरांनी या निवडणुकीत धडा शिकवण्याचा विडाच उचलला आहे.

मराठवाड्यात प्रचाराचा धुरळा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'अशा' असणार शरद पवारांच्या सभा..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT