Udhav Thackeray, Prasad Lad
Udhav Thackeray, Prasad Lad sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ते मनोरुग्ण झालेत, त्यांच्यावर राऊतांचा परिणाम...

सरकारनामा ब्युुरो

Prasad Lad on Udhav Thackeray : भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची १९९० पासून एकच कॅसेट सुरु आहे, संविधान बदलणार, मुंबई तोडणार. यावरच ते अडलेले आहेत. हे बोलत असताना संविधान न मानणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही गेला आहात, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे सातत्याने भाजप व मोदींवर टीका करताना आपल्या भाषणात सातत्याने संविधान बदलणार, मुंबई तोडणार, याच विषयावर बोलत आहेत. त्यावरुन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे हे मनोरुग्ण झाले असून त्यांच्यावर संजय राऊत यांचा परिणाम झाला आहे. त्यांचा ४८ जागा जिंकण्याचा दावा हास्यास्पद आहे.

मागील निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या आणि फडणवीसांच्या नावावर मते मागून आमदार, खासदार निवडून आणले. ते गद्दारभूषण आहेत. त्यांनी आम्हाला गद्दार कोण हे सांगू नये. झूट की युनिव्हर्सिटीचे प्राचार्य शरद पवार Sharad Pawar तर विद्यार्थी उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना न्यायालयाने दिलेल्या क्लिन चिटवर प्रसाद लाड म्हणाले, ही क्लीन चिट यंत्रणेने दिलीय. न्यायालयाने मार्ग मोकळा केला असावा. वहिणींचा राजकारणाशी संबंध नव्हता. राज्य बँकेशी त्यांचा संबंध नव्हता. यंत्रणा आणि न्यायालयाने त्यांना न्याय दिला आहे.

अमरावतीत बच्चू कडू यांनी केलेल्या राड्यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले, बच्चू कडू हे नौटंकी करत होते. त्यांचा पराभव दिसत आहे. अधिकाऱ्यांशीही ते उद्धटपणे बोलत होते. ही नौटंकी त्यांच्यासारख्या नेत्याला शोभत नाही. अजित पवार यांचा फोटो अमरावतीतून गायब झाला आहे, या विषयावर लाड म्हणाले, माझं रवी राणा यांच्याशी बोलणं झालं आहे, असा कोणताही प्रकार तेथे झालेला नाही,याबाबत शरद पवार यांचा पक्षच अफवा पसरवतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानविषयी प्रसाद लाड म्हणाले, देशात निवडणुका हा उत्सव म्हणून साजरा व्हावा. जास्त लोक भाग घेतील तेवढी लोकशाही मजबूत होईल. दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यातपर्यंत जास्तीत जास्त लोक मतदानात सहभाग घेतील हा आमचा प्रयत्न असेल. संजय राऊत यांच्या आरोपावर लाड म्हणाले, मला भुक्कड माणसाचं नाव घेऊन पत्रकार परिषद खराब करायची नाही. जनता बघतेय मोदींना किती प्रतिसाद मिळतोय ते. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या सभांना गर्दी करत आहेत.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT