Shivsena News : कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का; जिल्हा महिला संघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!

Kalyan Shivsena and Thackeray News : 'त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नकोय, त्यांना फेस टू फेस बोलणार नेता हवाय' म्हणत एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
Kalyan Shivsena
Kalyan Shivsenasarkarnama
Published on
Updated on

Shinde vs Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देणे सुरू आहे. गुरुवारी कल्याण कल्याण जिल्हा महिला संघटकासह सुमारे शंभर पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील कोपरी पूर्व येथे चैत्र नवरात्रौत्सव मंडपात जाहीर प्रवेश केला. यात कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले.

याचदरम्यान बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला ज्यांनी तिलांजली दिली, आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले, त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kalyan Shivsena
Mallikarjun Pujari : ठाण्यात आणखी एक ट्विस्ट; मल्लिकार्जुन पुजारींना OBC बहुजन पार्टीकडून उमेदवारी!

तसेच पुढे बोलताना, शिवसेनेत आजही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या पद्धतीने काम सुरू आहे. राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामे झाली आहेत, ही विकास कामे पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत आहेत. त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको आहे, त्यांना फेस टू फेस बोलणार नेता हवा असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.

'त्या' राजकारणाला कंटाळून हा प्रवेश - पोटे

तिकडे 80 टक्के समाजकारण आणि 20 टकेक राजकारण न होता केवळ राजकारणच केले जात होते. त्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. असे मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केले.

Kalyan Shivsena
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या जाहिरात होर्डिंगवर पालिकेची कारवाई ..!

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. या मतदारसंघातून अद्यापही महायुतीने उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र इंडिया आघाडी पाठोपाठ आता ओबीसी बहुजन पार्टीने धनगर समाजाच्या मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com