Manoj Jarange On Eknath Shinde :  Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange On Eknath Shinde : ठाण्यात येऊन जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनाच उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात; म्हणाले, 'तुम्हाला दंगली...'

Chetan Zadpe

Thane News : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान पेटवून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन त्यांनाच थेट इशारा दिला आहे. ठाण्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे यांच्या सभांना रात्री उशीर होत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, तसेच यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलकांवरही गुन्हे दाखल केले होते. यावर आक्रमक होत आता जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

"मराठा समाजाने शांत राहून आंदोलने केली, तरी आमच्यावरच सरकारकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे आता सरकारला आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवायची नाही का? असा थेट सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 'आम्ही कायदा सुव्यवस्था राखत आहोत, शांततेत आंदोलनं करत आहोत. आमच्याकडून कायदा सुव्यवस्था राखली जात असताना, आमच्यावरच गुन्हे का नोंदवले जात आहेत?" असा सवालही जरांगेंनी विचारला आहे.

जरांगे म्हणाले, "आंदोलन करताना ते शांततेत करा असं समाजाला सांगत आहोत. मात्र, आम्ही अशी समंजस्यपणाची भूमिका घेतल्यानंतरही आमच्यावर गुन्हे का ठोकत आहात? राज्यभरात हे सगळे गुन्हे आमच्यावरच ठोकले जात आहेत. त्यामुळे माझा सरकारलाच प्रश्न आहे की, तुम्हीच या गोष्टी पुढे करत आहात का? माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की, सरकारलाच दंगली भडकवायच्या आहेत का?" असाही सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे.

"मराठा समाजाच्या तरुणांमध्ये तीव्र रोष होता, पण आमच्या सभांमुळेच काही प्रमाणात रोष कमी करण्यात मदत झाली. सरकारचंच काम आम्ही करतोय. आम्हाला सभा घेण्यात कसल्याही अडचणी सरकारने तयार केल्या नाही पाहिजे, पण आम्हालाच जर का खिंडीत पकडायचं काम सरकारकडून होत असेल तर पुढे बघूच," असा थेट इशाराही जरांगेंनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT