Bhaskar Jadhav-Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांचा भुजबळांच्या आडून भाजपवर निशाणा; ‘जामिनावर असल्याची आठवण करून दिली ’

Vijaykumar Dudhale

Mumbai News : जालना जिल्ह्याच्या अंबड येथील ओबीसी मेळाव्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद अजूनही उमटताना दिसून येत आहेत. शिवसेना उपनेते आमदार भास्कर जाधव यांनी भुजबळ यांच्या आडून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच भुजबळ अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत, असा आरोपच जाधव यांनी केला आहे. (Bhaskar Jadhav criticizes BJP through Chhagan Bhujbal)

ज्या आवेशात आणि भाषेमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आव्हानाची भाषा केली. अशी आव्हानात्मक भाषा करायची भुजबळ यांना काय गरज होती. भुजबळ यांना अशी कोणीतरी धमकी दिलेली दिसते. तुम्ही अशा प्रकारची वक्तव्ये करण्यापेक्षा तुम्ही जामिनावर बाहेर आहात, याची आठवण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने करून दिली असल्यामुळेच भुजबळ यांच्याकडून अशा प्रकारची विधाने होत आहेत, असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहे. मात्र, माझी दोन्ही समाजाच्या लोकांना संयम ठेवण्याची विनंती आहे, असे आवाहन शिवसेना आमदार जाधव यांनी केले. आमदार भास्कर जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी अंबडमधील सभेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः भुजबळ यांचे भाषण संपल्यानंतर काही वेळातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.

भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले होते, तसेच अंबडमधील सभेत एकाच व्यासपीठावर येऊन जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करणारे आणि ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाबाबत भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ यांच्या भूमिकेशी सहमत नाही. भुजबळ यांची टोकाची भूमिका आहे, यापुढे मी त्यांच्या कोणत्याही मंचावर जाणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर आज खुद्द भुजबळ यांनी आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील हे माझ्याविरोधात दररोज वैयक्तिकरित्या टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला मी उत्तर देऊ का नको, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT