Mumbai, 09 February : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाद्ग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आणखी वादग्रस्त विधान पुढे आले आहे. आता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले विधान व्हायरल झाले आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर राहूल सोलापूरकर यांच्या कानाखाली जाळ काढण्याची भाषा केली आहे. ‘कोणी नाही मारलं तर चालेल; पण मी तुला मारणार,’ अशा शब्दांत आव्हाड यांनी सोलापूरकर यांना चॅलेज केले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, मनुवाद्यांच्या डोक्यातील चातुवर्णीयांचे भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, ज्ञानी असेल, तो ब्रह्माणच असेल, असं राहूल सोलापूरकर बोलत आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मणही करून टाकतो. आता त्या राहूल सोलापूकरच्या कानाखाली जाळ काढला, म्हणजे कानशिलात वाजवली तर त्याच्यातील मनुवाद बरोबर जागा होईल.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायची आणि समाजात विष कालवायची राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) याला काय गरज आहे. सोलापूरकर तू बाबासाहेब आंबेडकरांना अरे तुरे करतो. अरे आम्ही म्हणू, कारण तो आमचा बाप आहे. तू म्हणशील का आंबेडकर माझा बाप आहे. तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, असंही आव्हाड यांनी स्पष्ट झाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे शब्द गप्प मागे घे. कोणी नाही मारलं तरी चालेल; पण मी तर तुला झोडणार. मी तुला मारणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा अपमान आम्ही सहन करणार नाही. राहुल सोलापूरकरने आता डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील.
लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. तुम्ही त्यांना थेट ब्राह्मण करता आणि अरे तुरे करता. तुमची लायकी काय. एखाद्या सिनेमात भूमिका केली म्हणजे तुम्ही काय स्वतःला अमिताभ बच्चन समजायला लागलात का? राहुल सोलापूरकर हे जे काही बरळला आहे, त्यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतो आणि माथी भडकू शकतात. आम्ही माथी भडकणार आणि राहूल सोलापूरकरला जन्माची अक्कल शिकविणार, असा थेट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.