kapil patil uddhav thackeray jalindar sarode sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या उपस्थितीत नवा पक्ष स्थापन करणाऱ्या कपिल पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयांनी बांधलं 'शिवबंधन'

Akshay Sabale

आमदार कपिल पाटील ( Mla Kapil Patil ) यांना धक्का बसला आहे. कपिल पाटील यांचे विश्वासू आणि शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केला ( Jalindar Sarode Join Shivsena UBT ) आहे. उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) उपस्थितीत 'मातोश्री' निवासस्थानी जालिंदर सरोटे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. कपिल पाटील यांनी 3 मार्चला नव्या पक्षाची स्थापना केली आहे. आता खंद्या समर्थकानं कपिल पाटलांची साथ सोडल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कपिल पाटील ( Kapil Patil ) यांनी जनता दल ( युनायटेड ) पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. तसेच, कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) पाठिंबा जाहीर केला. अशातच कपिल पाटील यांचे विश्वासू जालिंदर सरोदे यांच्यासह अनेक शिक्षकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जालिंदर सरोदेंच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाहीl, असं होत नाही. वेळप्रसंगी शिक्षकांना हातात छडीसुद्धा घ्यावी लागेल. सध्याच्या राजकीय कार्यकाळात सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज आहे. कारण ही आपली संस्कृती नाही. भावी पिढी नासून नासक्या, कुचक्या लोकांच्या हातात जाणार असेल, तर मग शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग काय?"

"फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. काहीतरी हवं म्हणून अनेकजण विरोधातील सत्ताधारी पक्षात जातात, पण आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिक्षक मतदारसंघाकडे शिवसेनेचं दुर्लक्ष झालं होतं," अशी खंत ठाकरेंनी बोलून दाखवली.

"शिक्षकांसाठी लढण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पण, सत्ता आल्यानंतर न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे. न्याय मिळवण्यासाठी महापालिका, विधानसभेत नाही तर लोकसभेतही भाजपला तडीपार करायचे आहे. तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. तडीपारीची नोटीस दिली आहे, त्यावर शिक्कामोर्तब तुम्ही करायचं आहे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिक्षकांना केलं आहे.

कोण आहेत जालिंदर सरोदे?

शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू आणि शिक्षक भारतीय संघटनेचे सरचिटणीस म्हणून जालिंदर सरोदेंची ओळख आहे. जालिंदर सरोदे गेल्या 18 वर्षांपासून म्हणजेच शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून कार्यरत होते. शिक्षक भारतीमधील अंतर्गत नाराजी आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी डावलल्यानं जालिंदर सरोदे नाराज होते. त्यामुळे सरोदेंनी शिक्षक भारती सोडून ठाकरे गटात प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT