MNS Threat On Marathi Patya : Sarkarnama
मुंबई

MNS Threat On Marathi Boards : मराठी पाट्या लावा नाही तर, दोन दिवसांत तोडफोडच; मनसेची थेट धमकी!

MNS Threat On Marathi Patya : '7 लाखांपैकी फक्त 28 हजार दुकानदारांकडूनच मराठी पाट्यांचा नियम पाळल्याची माहिती...'

Chetan Zadpe

Mumbai News : दुकान व आस्थपणांना मराठी भाषेतील नामफलक लावण्याकारिता मुंबई उच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर ही मुदत दिली होती. त्यानुसार आता ही मुदत संपलेली आहे. यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नामफलकाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. दोन दिवसात मराठी पाट्या लावा, नाहीतर खळ्ळ-खट्ट्याक आंदोलन होईल, अशी थेट धमकी मनसेने दिला आहे. यामुळे राज्यात आता मराठी पाट्यांचा मुद्दा तापणार आहे. (Latest Marathi News)

अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदार आणि व्यावसायिकांना दुकानाच्या दर्शनी भागात टळक अक्षरात मराठी भाषेतील फलक लावण्याचा इशारा देण्यात आला. काही दुकानदारांना मराठी भाषेतील नाम फलक असलेले बॅनर देखील देण्यात आले. जर दोन दिवसात दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाहीत तर मनसे स्टाईलने खळ्ळ-खट्याक आंदोलन करण्याचा इशारा, देखील यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी दिला आहे.

मुंबईत जवळपास 7 लाख दुकाने व आस्थापनं अधिकृतपणे स्थापित आहेत. 7 लाखांपैकी फक्त 28 हजार दुकानदारांकडूनच मराठी पाट्यांचा नियम पाळल्याची आकडेवारी उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली आहे.

यात विशेष बाब म्हणजे दुकानाच्या पाट्या मराठीतून लावा यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दुकानदारांना देण्यात आली होती. मात्र एवढी मुदत देऊनही मराठी पाट्या न लावण्याऱ्या दुकानदारांवर आता कायद्याचा बडगा उगारुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT