BJP Flag Sarkarnama
मुंबई

Mumbai BJP President : मोठी अपडेट! मुंबई भाजपचा अध्यक्ष दिल्लीतून ठरणार? 'हे' तीन नावे आहेत शर्यतीत

BJP Mumbai leadership News: प्रदेशाध्यक्ष ठरला तरी मुंबई भाजपचा अध्यक्ष अद्याप ठरलेला नाही. याबाबतचा निर्णय आता दिल्लीतून होणार असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे. निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष ठरला तरी मुंबई भाजपचा अध्यक्ष अद्याप ठरलेला नाही. याबाबतचा निर्णय आता दिल्लीतून होणार असल्याचे समजते. मुंबई भाजपचा अध्यक्षपदासाठी तिघामध्ये जोरदार रस्सीखेच आहे. त्यामुळे दिल्लीतून काय निर्णय घेतला जाणार? याबाबत उत्सुकता कायम आहे.

आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. राज्यातील भाजपच्या सर्व संघटनात्मक निवडी पार पडल्या असून केवळ प्रदेशाध्यक्षाची घोषणा बाकी आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई भाजप (BJP) अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्याने या पदासाठी इच्छूक असलेल्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम, माजी आमदार सुनील राणे हे मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. या तिघांमध्ये मोठी चुरस आहे.

त्यातच मुंबई भाजपचे अध्यक्षपद गेल्या काही दिवसापासून कॅबिनेट मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे आहे. भाजपच्या एक पद, एक व्यक्ती नियमानुसार शेलार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने मुंबई भाजपचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यातच काही जणांची आशिष शेलार यांना मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावे आणि त्यानंतरच मुंबई अध्यक्ष पदाची नव्याने निवड करावी, असा अंतर्गत सूर भाजपमध्ये आहे.

मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शेलार यांना मुंबई महापालिका निवडणुका संपेपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाचा निर्णय दिल्ली दरबारी होणार आहे. त्यामुळे दिल्लीतून केंद्रीय मंत्री शाह काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या तीन नेत्यांमध्ये होणार स्पर्धा?

माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम तसेच माजी आमदार सुनील राणे हे मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. या तिन्ही नेत्यांनी पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी लॉबिंग देखील सुरू आहे. त्यामुळे दरेकर, साटम आणि राणे या नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे .

येत्या काळात मंत्री आशिष शेलार यांना मुंबई महापालिका निवडणुका संपेपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून प्रवीण दरेकर, अमित साटम हे देखील लॉबिंग करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे नेते प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT