Bmc News Srakarnama
मुंबई

BMC Officers Transfer : मुंबईत महापालिकेत मोठे फेरबदल; 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai Corporation Officers Transfer Order: एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर खांदेपालट करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात प्रशासन विभागात बदल्यांचा धडाकाच सुरू आहे. आयएएस आणि आयपीएस अशा दोन्ही पातळींवर या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. पण याचवेळी आता मुंबई महापालिकेमधून (BMC) मोठी अपडेट समोर आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी (ता.28) महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यांनी 7 उपायुक्तांसह तसेच एकूण 12 सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर खांदेपालट करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तब्बल 74,427.41 कोटींचा हा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ करण्यात आली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. पण त्यानंतर आता महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

अ) सहआयुक्त / उपायुक्त संवर्गातील बदली विषयक पुढीलप्रमाणे -

1) विश्वास शंकरवार, सहआयुक्त (परिमंडळ ४) यांची सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) (+संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष) येथे बदली करण्यात आली आहे.

2) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ७) यांची उपायुक्त (परिमंडळ ४) येथे बदली करण्यात आली आहे.

3)संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था)यांची उपायुक्त (परिमंडळ ७) येथे बदली करण्यात आली आहे.

ब) उपायुक्त संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना विषयक आदेश पुढीलप्रमाणे -

1) शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) यांची उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+माहिती तंत्रज्ञान विभाग) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) येथे बदली करण्यात आली आहे.

2) अजित आंबी, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) यांची उपायुक्त (उद्याने) येथे बदली करण्यात आली आहे.

3) पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिसारण)यांची उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) येथे बदली करण्यात आली आहे.

4) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) यांची उपायुक्त (परिमंडळ ३) येथे बदली करण्यात आली आहे.

क) सहायक आयुक्त संवर्गात बदलीविषयक आदेश पुढीलप्रमाणे

1) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) यांची सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) (+सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे)  येथे बदली करण्यात आली आहे.

2) मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) यांची सहायक आयुक्त (डी विभाग) (+सहायक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार)  येथे बदली करण्यात आली आहे.

3) अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) यांची  सहायक आयुक्त (एस विभाग)  येथे बदली करण्यात आली आहे.

4) नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) यांची सहायक आयुक्त (बी विभाग)  येथे बदली करण्यात आली आहे.

ड) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवडीने सहायक आयुक्त संवर्गात पदस्थापना विषयक आदेश पुढीलप्रमाणे.. 

1) दिनेश पल्लेवाड :  सहायक आयुक्त, एच पश्चिम विभाग

2) योगिता कोल्हे : सहायक आयुक्त, टी विभाग

3) उज्वल इंगोले :  सहायक आयुक्त, एम पूर्व विभाग

4) अरूण क्षीरसागर:  सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग

इ) सहायक आयुक्त संवर्गात कार्यभार / कार्यभार बदली विषयक आदेश पुढीलप्रमाणे आहेत. 

1) अजय पाटणे – सहायक आयुक्त (टी विभाग) (कार्यभार) यांची सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) (कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे.

2) शंकर भोसले – सहायक आयुक्त, बी विभाग (कार्यभार) यांची  सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) (पूर्णकालिक कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे.

3) नवनाथ घाडगे - उपप्रमुख अभियंता (प्रभारी), वस्ती स्वच्छता कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन खाते यांची सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) (अतिरिक्त कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे.

4) संजय इंगळे, उपप्रमुख अभियंता (पूल) यांची सहायक आयुक्त (सी विभाग) (पूर्णकालिक कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT