Mumbai Lok Sabha Election Sarkarnama
मुंबई

Mumbai Lok Sabha Election : शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत परप्रांतीय मते निर्णायक; मुंबई उत्तर-पश्चिम कुणाची?

Chetan Zadpe

Mumbai News : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचे दोन गट आमने सामने आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर यामध्ये शिंदे गटाचे नेते खासदार गजानन कीर्तीकरांची अडचण झाली आहे. शिंदे गटाकडे असलेले गजानन कीर्तीकरांवर आपल्या मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ आली आहे. तर नुकचेच शिंदे गटात दाखल झालेले वायकर यांना उद्धव ठाकरेंविरोधात बोलावे लागत आहे. दरम्यान या मतदरासंघात परप्रांतीय मते गेमचेंजर ठरु शकतात. (Latest Marathi News)

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात 2014 नंतर कीर्तीकर यांचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. 2024 आणि 2019 च्या लोकसभेला मोठ्या मताधिक्याने शिवसेनेने हा मतदारसंघ जिंकला होता. कीर्तीकर यांनी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा पराभव घडवून आणला होता. मात्र शिवसेनेल्या फुटीनंतर कीर्तीकर शिंदे गटासोबत गेले. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबत कायम राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये जोगेश्‍वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम, अंधेरी पूर्व असे सहा महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव होतो. यामध्ये वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव हे मतदारसंघ सोडले तर इतर तीन मतदारसंघात 60 टक्क्यांपेक्षा अधिक उत्तर भारतीय अन् इतर परप्रांतीय मतदार वास्तव्याला आहेत. तर इथे मराठी मतांचे प्रमाण जवळपास 30 टक्के आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्‍वरी विधानसभेतून सिटींग आमदार आहेत. चार टर्म नगरसेवक आणि तीन टर्म आमदार राहिले आहेत. त्यांनी भरभक्कम प्रचारयंत्रणा राबवली आहे. तर वर्सोवा आणि गोरेगाव येथील भाजप आमदार मैदानात आहेत.नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी नाईलाजे आपल्याला शिंदेंकडे जावे लागले, अशी कबुली दिल्याने ठाकरे गटाच्या हाती आयतेच कोलीत आले आहे.

दुसरीकडे ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना आपल्या वडिलांसाठी याआधी राबवेलेल्या प्रचार यंत्रणेचा अनुभव आहे. या मतदारसंघातील सुनील प्रभू आणि ऋतुजा लटके हे विद्यमान दोन आमदार दोन किर्तीकरांची जमेची बाजू आहे. सोबतच महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही त्यांच्या बाजूला आहेत.

महत्त्वाचे मुद्दे -

- वाहतूक कोंडी

- एमआयडीसी आणि काही विभागांत पाण्याचा प्रश्‍न

- इमारतींचा पुनर्विकास

- काही भागांत नागरी सुविधांचे मोठे प्रश्‍न

2029 चा निकाल -

- गजानन ‍कीर्तिकर (शिवसेना) विजयी - 5,70,063 ( 60.55 टक्के)

(दोन लाख 60 हजार 328 मताधिक्य)

- संजय निरुपम (काँग्रेस) - 3,09,735 (32.9 टक्के)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT