Mumbai News : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत तपासासाठी पोलिसांच्या 15 तुकड्या तैनात केल्या. मात्र, दोन महिन्यांपूर्वी दहिसर येथे फेसबुक लाइव्ह करून मॉरीस नोरोनाने अभिषेक घोसाळकरवर गोळीबार केल्याप्रकरणी तपास अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हा सिलेक्टिव्ह जस्टीस आहे, असे म्हणत तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकत मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान यांच्या घरावर काल पहाटे दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत तपासासाठी पोलिसांच्या 15 तुकड्या तैनात केल्या.
मात्र, दोन महिन्यांपूर्वी दहिसर येथे फेसबुक लाइव्ह करून मॉरीस नोरोनाने अभिषेक गोसाळकरवर गोळीबार केला, यात त्याचा मृत्यूदेखील झाला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू आहे. स्वतः घोसाळकर कुटुंबीयांनी घटना घडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. मात्र, अद्यापही पोलिसांकडून म्हणावा तसा तपास सुरू झाला नसल्यामुळे मुंबई पोलिसांकडून एक सेलिब्रिटी म्हणून सलमान खान याच्यासाठी दाखवलेली तत्परता अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी दाखवली नाही.
तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये अशा गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढच झाली आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, राजकारण कुठे चालले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कालचा गोळीबार हा स्टंट आहे की काय आहे, याबद्दल माहिती नाही. आत्ता इलेक्शन चालू आहे आणि हा स्टंट आहे का? असेही त्यांनी नमूद केले आहे. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणामध्ये आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिला आहे. त्याचे तुम्ही का उत्तर देत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जे आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे ते खुलेआम फिरत आहेत. ते आरोपी माझे कोणी काही करू शकत नाही, अशी धमक्याही देत आहेत. सलमान खान सेलिब्रिटी आहेत म्हणून तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पटकन काढलं आणि आरोपीचा तपास वेगाने सुरू केला. पोलिसांच्या 15 - 15 टीम तुम्ही बोलवता कारण तो सेलिब्रिटी आहे म्हणून का.
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात तुम्ही का तपास करत नाही. यातही काही राजकारण आहे का? या सर्व प्रकरणाबाबत आम्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांची भेट करून कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.