मुंबई : जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा (ED) एजंट आहे. त्याच्या ७ कंपन्या असून त्या मार्फत खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. जितेंद्र नवलानी आणि ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीबद्दल मुंबई पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून पोलिस त्याची चौकशी सुरू करत आहेत. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार, हे माझे शब्द लिहून ठेवा, असेही त्यांनी सांगितले. (Four ED officers to go to jail: Sanjay Raut)
खासदार राऊत यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांसह भाजप नेते आणि ईडीवर तुफानी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, DHFL घोटाळ्यात नवलानी याचा संबंध. या कंपनीकडून नवलानी याच्या अकाउंटवर 25 कोटी जमा झाले आहेत. त्यामध्ये वाधनवानकडून दहा कोटी आणि अविनाश भोसले यांच्या कंपन्यांकडून सात कोटी रुपयांचा समावेश आहे. ईडीची चौकशी सुरू होताच अविनाश भोसलेंकडून ईडीचा एजंट नवलानीच्या अकाउंटवर हे पैसे जमा करण्यात आले आहेत. (Latest Political News in Marathi)
जितेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात. नवलानी आणि सोमय्या यांचा काय संबंध आहे, हे मी लवकर सांगेल. हे मोठे रॅकेट मुंबई आणि दिल्लीत बसून चालले आहे. मी आता जे सांगितले आहे ते फक्त दहा टक्के आहे. याबाबत दक्षता विभागाचा रिपोर्टदेखील आला आहे. हा रिपोर्टही पंतप्रधानांना माहिती आहे, असा दावाही राऊतांनी केला. (Sanjay Raut News)
राऊत म्हणाले की, जितेंद्र नवलानी आणि ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीबद्दल मुंबई पोलिसांकडे फिर्याद दाखल. मुंबई पोलिस याची चौकशी सुरू करत आहेत. ईडीचा सारा पैसा विदेशात चालला आहे. या वसुलीमध्ये भाजपचे नेतेदेखील सहभागी आहेत. याची सारी माहिती मी देणार आहे. त्याची अधिकृत तक्रार मी दाखल केली आहे. मी हे सारे कागदावर बोलतो आहे. आता आमच्या महाराष्ट्र पोलिसांकडे याची कागदपत्रे दिली आहेत. किरीट सोमय्या हे आमच्याविरोधात कागद फडकवतात. ती पीएमसी बॅंक घोटाळा, डीएचएफल याच्याबद्दल ते आम्हाला प्रश्न विचारतात. पण, डीचएफएलच्या वाधवान सोबत सोमय्या यांचे काय संबंध आहेत, हे मी विचारले होते, त्याबाबत काहीही सांगितले जात नाही.
किरीट सोमय्या यांनी 2012 ते 2016 पर्यंत DHFL आणि GVK जमीन घोटाळ्या बाबत MMRDA कडे तक्रार करत होते, तर सोमय्या यांचा DHFL च्या वाधवानसोबत नील किरीट सोमय्या भागीदार कसे काय? माझे शब्द लिहून ठेवा, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे बाप-बेटे तुरूंगात जाणार. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे. भाजपच्या नेत्यांचीही नावे पुढील पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक समोर ठेवून तुम्ही आमच्यावर अशा छोट्या कारवाया करणार असाल तर ते बूमरॅंग होईल. तुम्ही मुंबईमध्ये कशा प्रकार खंडणीचे रॅकेट चालविले, हे आम्हाला माहिती आहे. अरविंद भोसले यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ज्या प्रकारे केंद्रीय संस्थांना अधिकार आहेत, तसेच अधिकार मुंबई पोलिसांना आहेत. हे तुम्हाला लवकरच कळेल, असा सूचक इशाराही राऊतांनी या वेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.