Mumbai News : मुंबई महापालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यातच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे राज ठाकरेंची मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच दिसंत आहे. विशेषता आठ दिवसापूर्वी झालेल्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तीन पैकी एक नगरसेवक पद मनसेला हवे होते, मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वीकृत नगरसेवकाचे एक पद दिले नसल्याने नाराजी होती.
त्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena) मनसेला प्रभाग समितीचे अध्यक्षपद सॊडण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे दोन्ही सेनेत अनेकवेळा चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या मनसेच्या नेत्यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच दोन्ही पक्षातील वाद समोर आला होता. त्यामुळे दोन्ही सेनेंतील हा तिढा सोडविण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न केले जात होते.
बुधवारी दुपारी आमदार वरुण सरदेसाई यांनी या साठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी मिळून मनसे (MNS) नेते यशवंत किल्लेदार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर या दोघातील बैठकीनंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाबाबतचा तिढा सुटला असून मनसेने घातलेल्या अटीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता प्रभाग समिती निवडणुकीसाठी तटस्थ राहणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
उद्या होत असलेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेला झुकते माप देण्यात येणार असल्याने मनसेची नाराजी दूर झाली आहे. त्यासोबतच मनसे तटस्थ राहणार नसल्याने आता भाजप, एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दरम्यान, दोन्ही पक्षातील वाद मिटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकानी व मनसेच्या नगरसेवकानी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पक्षात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरला असून त्याप्रमाणे अर्ज दाखल करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.