Eknath Khadse Sarkarnama
मुंबई

Eknath Khadse News : अँजिओप्लास्टीनंतर माझं हृदय १०० टक्के बंद पडलं...श्वासही थांबला; एकनाथ खडसेंनी सांगितली आपबिती

Medical News : त्यानंतर माझ्या नशिबानं ती यंत्रणा पुन्हा सुरू झाली.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : ॲंजिओप्लास्टीनंतर ‘कार्डियाक अरेस्ट’मुळे माझं हृद्‌य १०० टक्के बंद पडलं. त्यामुळे माझा ऑक्सिजन व इतर सर्व यंत्रणा बंद पडल्या. मात्र, डॉक्टरांनी वेळीच दोन मिनिटांची ‘शॉक ट्रीटमेंट’ दिली आणि माझ्या नशिबानं माझी शारीरिक यंत्रणा पुन्हा सुरू झाली. पण, तुमचं विमान वेळेवर आलं नसतं, तर माझं विमान ‘टेक ऑफ’ झालं असतं, तर पुन्हा लॅंड झालंच नसतं, अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपबिती सांगितली. (My heart stopped 100 percent after angioplasty : Eknath Khadse)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी त्यांना जळगावहून मुंबईला आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर ॲम्ब्युलन्सची तातडीने व्यवस्था केली होती. त्यानंतर खडसे यांच्यावर मुंबईत आणून तातडीने उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर बरे झालेल्या खडसेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन लावून धन्यवाद दिले. त्यावेळी त्यांनी स्वतःवर ओढावलेला प्रसंग सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपला विषय छोटाच होता. आपल्या दृष्टिकोनातून तो फार मोठा नव्हता, पण मला त्यावेळी एअर ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. काही वेळानंतर मला ती मिळाली. ती नाशिकला उभीही होती. पण त्याची परवानगी मिळत नव्हती. तुम्ही बोलल्यामुळे ते लवकर मिळालं आणि मी वेळेत हॉस्पिटलला पोचू शकलो, असेही खडसेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या हृदयाला दोन ब्लॉकेजेस शंभर टक्के होते. तिसरा एक होता, तो ७० टक्के होता. सीरियस असल्यामुळे डॉक्टरांनी दोन ब्लॉकेजेसचे ऑपेरशन केले. ऑपरेशनही चांगलं झालं होतं. एका स्ट्रेचरवरून मी दुसऱ्या स्ट्रेचरवर गेलो.

ऑपरेशननंतर ‘कार्डियाक अरेस्ट’मुळे माझं हृद्‌य १०० टक्के बंद पडलं. माझं हृदय शंभर टक्के बंद पडल्यामुळे माझा ऑक्सिजन, हृदय असं सगळं बंद पडलं. त्याच वेळी डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत दोन मिनिटांची ‘शॉक ट्रीटमेंट’ दिली. त्यानंतर माझ्या नशिबानं ती यंत्रणा पुन्हा सुरू झाली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं, तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं, तर पुन्हा लॅंड झालं नसतं, असंही खडसेंनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT