Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar CM News : ‘एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा’; राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात घुमला नारा

NCP Women Aghadi : महिला आघाडीच्या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Jui Jadhav

Mumbai News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबईत महिला मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. या महिला मेळाव्यातून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा नारा देण्यात आला. (NCP Women's Aghadi is determined to make Ajit Pawar the Chief Minister)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीच्या वतीने मुंबईत महिला मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांतून त्या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्याला आलेल्या महिलांनी टोप्या परिधान केल्या होत्या. या टोप्यांवर एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा आशयाचा मजकूर होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिला मेळाव्यातून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा नारा देण्यात आला. प्रत्येक वक्त्याच्या भाषणातून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार बोलून दाखवण्यात आला. त्यामुळे आजच्या मेळाव्यातून देण्यात आलेल्या नाऱ्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मुंबईत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला राज्याच्या 36 जिल्ह्यांतून महिला आल्या होता. अजित पवारांनी महिलांसाठी घेतलेले निर्णय याचीही माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाने महिला संघटनेचे शक्तिप्रदर्शन करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहही कमी पडले, त्यामुळे पुढील वेळेस वानखेडे मैदानावर मेळावा घेऊ, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

महायुतीच्या नेत्यांकडे लक्ष

अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बघण्याची इच्छा त्यांच्या गटातील अनेक नेत्यांनी यापूर्वीही बोलून दाखवली. दादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी या महिलांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करण्यात येईल. दादा, तुम्हाला मुख्यमंत्री करूच, असा नारा चाकणकर यांनी दिला. अजित पवार जरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती सरकारमध्ये सहभागी असले, तरीही अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचा नारा दिला जात आहे. आता महायुतीमधील इतर दोन पक्षांची काय प्रतिक्रिया असणार, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT