ajit ghopchade, ashok chavan, medha kulkarni  Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election 2024 Update : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध; चव्हाण,पटेल, देवरा,हंडोरे यांच्यासह सहाही जणांना खासदारकी

Maharashtra Politics : 'या' दिवशी होणार अधिकृत घोषणा

Deepak Kulkarni

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची, याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झालं आहे.सत्ताधारी पक्षांच्या वतीने भाजप 3,एकनाथ शिंदेंची शिवसेना1 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना 1,तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.याच पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली असून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

यात आता भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी,डॉ.अजित गोपछडे तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांच्यासह काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 20 फेब्रुवारीला केली जाणार आहे.

राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात झालेल्या एकमतानुसार भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने उमेदवार दिला नव्हता.

राज्यसभेचा उमेदवारी देताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार यांनी इतर पक्षांना धक्का देत राज्यसभेचे उमेदवारी दिली. भाजपने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना तर शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसमधून सेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रफुल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांचा कार्यकाळ बाकी असतानाही त्यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय का घेतला ? यामागे नेमकं काय गणित आहे ? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आले होते.

बावनकुळेंचे संकेत...

महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2024) भाजप एकही जागा देणार नाही, अशी चर्चा रंगली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे जाहीर केले होते. बावनकुळे यांनी सर्वांकडे पुरेसा कोटा असल्याने चुरस निर्माण करण्यात तथ्य नाही. त्यामुळे भाजप चौथा उमेदवार देण्याचे नसल्याचे स्पष्ट केले होते.

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यापैकी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT