Sanjay Raut sarkarnama
मुंबई

NCP Crisis News : "नार्वेकर दामशास्त्री, हा किरकोळ निर्णय, चुलीत...", संजय राऊत संतापले

Sanjay Raut On NCP Crisis : "मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे", असंही राऊतांनी सांगितलं.

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar on NCP MLA disqualification ) यांनी मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी कुणाची हे ठरविताना विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं सांगत अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. तसेच, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील आमदारही नार्वेकरांनी पात्र ठरवलेले आहेत. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "या निर्णयानं कुणाला धक्का बसला नाही. देवाची आळंदी चोराची, आळंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापेक्षा कोणता वेगळा निर्णय असू शकतो. उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना धक्का बसला आहे. हा निर्णय म्हणजे हास्यजत्रा-२ आहे. लोक निर्णय बघून हसत आहेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"या शतकातील किरकोळ निर्णय आहे. याला ऐतिहासिक महत्त्व आहे, ना अभ्यास आहे. हा धडधडीत खून केला आहे. लोकशाही आणि एका पक्षाचा खून होत आहे. न्याय आसनावर बसलेली व्यक्ती खुन्याला निर्दोष सोडत आहे. याला काय निकाल म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल," अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली.

मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊतांनी म्हटलं, "विधानसभा अध्यक्ष रामशास्त्री आहेत का? ते दामशास्त्री आहेत. अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांना अपात्र केलं नाही. मुळात हा निकाल नाही. वरून एक कागद आला, त्याचं वाचन अध्यक्षांनी केलं आहे."

"मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे. नार्वेकरांनी काहीही निकाल देऊद्यात अथवा सांगूद्यात. भाजपच्या तिजोरीत काळा पैसा येतोय, तसा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याबाबत काळा निर्णय आहे. तो दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल," असं राऊतांनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT