NCP MLA Disqualification Case : निकालाचे स्वागत अन्‌ विधानसभा अध्यक्षांच्या सूचनांचे पालन करू; अजित पवार गटाची प्रतिक्रिया

Assembly Speaker Decision : विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या याचिका फेटाळून लावताना दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले आहेत.
 Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) दिला. शिवसेनेप्रमाणेच विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या निकालाबद्दल अजित पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्षांचे आभार मानताना त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. (Ajit Pawar group welcomed the result of the Assembly Speaker)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाने एकमेकांविरोधात पाच याचिका दाखल केल्या होत्या. त्यात शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात तीन याचिका दाखल केल्या होत्या, तर अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या विरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. (NCP MLA Disqualification Case)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Ajit Pawar-Sharad Pawar
NCP MLA Disqualification Result Live : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच; दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र

त्या सर्व याचिका फेटाळून लावत अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन गटांचे आमदार पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पक्ष आणि चिन्हाच्या बाबत निर्णय देताना शिवसेना प्रकरणाचा आधार घेतला आहे.

विधिमंडळातील बहुमताच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांचीच खरी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्यावर अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उमेश पाटील म्हणाले, निकालाचे आम्ही स्वागत करतो. या निकालाबद्दल विधानसभा अध्यक्षांचे आभार मानतो. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधोरेखित करणारा हा निकाल आहे.

पक्षांतर्गत वाद हे पक्षाने आपापसांत मिटवायला हवेत, असे निरीक्षणही विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना नोंदविले आहे. त्याबाबत प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, न्यायालय ज्या पद्धतीने निरीक्षण नोंदवित असतं, त्याचप्रमाणे हेही न्यायालयाचं आहे. न्यायाधीशांनी नोंदविलेली निरीक्षणेही महत्त्वपूर्णच असतात.

 Ajit Pawar-Sharad Pawar
Maharashtra Politics : पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांजवळ केलेले 'ते' विधान खरे ठरण्याची शक्यता...

आम्हीदेखील ती गांभीर्याने घेऊ. पक्षांतर्गत वाद हे मुळी होऊच नयेत आणि ते झाले असतील, तर ते मिटविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला हवेत, अशी विधानसभा अध्यक्षांची सूचना आम्हीदेखील स्वीकारण्याचा आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू.

R

 Ajit Pawar-Sharad Pawar
Rajyasabha Election : ...तर ठाकरे गटाच्या आमदारांचा तिथेच कार्यक्रम होणार; उद्योग मंत्री सामंतांनी दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com