Mumbai, 08 July : नाशिकमधील अवैध दारू वाहतुकीचे वाहन पाठलाग करून पकडताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला संबंधित वाहनाने धडक दिली. या धडकेत भरारी पथकातील वाहन चालकाचा मृत्यू, तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार गंभीर असून अवैध दारू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध संपूर्ण राज्यभरात सर्च मोहीम राबवण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. या आदेशांबरोबरच संपूर्ण उत्पादन शुल्क विभाग राज्यात ॲक्शन मोडवर आलेला आहे.
गोवा दमण बनावटीच्या दारू विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) मोठी सर्च मोहीम राबवत आहे. नाशिक (Nashik) येथे कर्तव्य बजावत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्याला मरण आलं. परंतु धडक मारून, एखाद्या कर्मचाऱ्याचा बळी घेऊन अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांना काही साध्य होणार नाही. उलट राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पूर्वीपेक्षा कडक सर्च मोहीम राबवली जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथकाबरोबर झालेला घटनाक्रम सांगितला. भरारी पथकाला अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला.
पथकाने घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड, असा सव्वाशे किलोमीटरपर्यंत वाहनाचा पाठलाग केला. पथकाला संबंधित वाहनाने धडक दिली, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे वाहन दोन वेळा उलटले. यात पथकाचे वाहनचालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
भरारी पथकाच्या वाहनाला धडक दिल्यानंतर संबंधित वाहनाचा शोध घेतला जात आहे. नाशिकमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क संयुक्तपणे कारवाई करत आहेत, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
ठाण्यात पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे. ठाण्याचा पालकमंत्री या नात्याने ठाण्यातील पावसाचा आढावा घेतला आहे. महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी उपस करण्यासाठी विद्युत पंप कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.