Ekanath Shinde Shiv sena Sarkarnama
मुंबई

Jain Muni statement: एकनाथ शिंदेंनी पागल लोकांना आवर घालावा : मनीषा कायंदे अन् उदय सामंत जैन मुनींच्या रडारवर

Shanti Sabha News : येत्या काळात महापालिका निवडणूक लढविणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. त्यासोबतच त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पागल लोकांना आवर घालावी, असे विधान केले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : दादरमधील कबतूर खाना पुन्हा सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबईतील जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शनिवारी जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांच्या उपस्थित शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा करण्यात आली. ही पार्टी येत्या काळात महापालिका निवडणूक लढविणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. त्यासोबतच त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पागल लोकांना आवर घालावी, असे विधान केले.

जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी मी फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना मानतो. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांच्या नेते मंडळींवर आवर घालावी, अशी मागणी केली. त्यासोबतच त्यांनी येत्या याकाळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी नव्याने स्थापन केलेला पक्ष उतरणार असल्याची घोषणा केली.

त्यासोबतच शांतीसभेत जैनमुनींनी वादग्रस्त वक्तव्य केले. एक-दोन जणांचा मृत्यू झाल्याने दादरचा कबतूर खाना बंद करणे चुकीचे आहे. मी डॉक्टरांना मूर्ख समजतो, असेही विधान त्यांनी केले. मृत कबुतराच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दादरमधील कबतूर खाना पुन्हा सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली.

कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचे असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होते?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असे विधानही कैवल्य रत्न महाराज यांनी केले.

कबुतरखान्यावरुन राजकारण सुरु आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत आहे, असा निशाणा देखील कैवल्य रत्न महाराज यांनी साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT