Sanjay Kokate Join NCP Sarkarnama
मुंबई

Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

Solapur Politics : माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी आज (ता. 05 एप्रिल) समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकाटे व त्यांच्या समर्थकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 April : संजय कोकाटे तुम्ही योग्य पाऊल टाकलेलं आहे. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करतो. पक्षसंघटना बळकट केली, तर माढ्यामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. पक्ष संघटना बूथपर्यंत पोचवली, तर तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल, त्यामुळे तुम्ही सर्वांनी ताकदीने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे (Sanjay Kokate)यांनी आज (ता. 05 एप्रिल) समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकाटे व त्यांच्या समर्थकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) स्वागत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुतारी आजपासून वाजवायला सुरुवात करा. महाराष्ट्राचे भवितव्य बदलण्याचे चित्र माढ्याच्या लोकसभा मतदारसंघापासून करा. मला आता खात्री आहे की, माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच निवडून येणार आहे. काय चिंतेचे कारण नाही, तुम्ही कामाला लागा. आपण दहा जागी उमेदवार उभे करतो आहोत, त्यातील आठ जागा आपल्या निवडून येतील, असा विश्वासही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मधल्या काळामध्ये संकटात होता. परंतु आता हळूहळू तिकडचे अनुभव येत असल्याने पुन्हा लोक पक्षाशी जुळत आहे. आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. सत्तारूढ पक्षाकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत. एखाद्या व्यक्तीने आमच्या पक्षात प्रवेश केला, की त्याच्या मागे लगेच तपास यंत्रणा लावली जाते. एखादा पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून जर रिंगणात असेल, तर त्या नेत्यावर तुम्ही कारवाई करत आहात, याचा अर्थ तुम्ही लोकशाही विरोधात आहात, असा अर्थ देशातील जनता काढू शकते.

शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील, आहेरगावचे सरपंच सुभाष पाटील सरपंच, सुनील गव्हणे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या वेळी संजय पाटील घाटणेकर, अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT