Mumbai, 11 January : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केली. राऊतांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे.
माजी खासदार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी आपल्या सोशल अकाउंटवर याबाबतची पोस्ट करून ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपामुळे ठाकरे यांच्यासभोवताली पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी की इतर कोणत्या कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंचा वैयक्तिक फायदा कोणता, असे सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
संजय राऊतांनी निवडणुकीसंदर्भात काय म्हटले होते?
नागपूरपासून मुंबईपर्यंत महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचं आहे, जे काही होईल ते होईल, आमचं तसं ठरतंय. मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार, असा सवाल करत कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या) निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्यात आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे आवाहनही खासदार संजय राऊत यांनी केले.
पवारांच्या राष्ट्रवादीला वेगळाचा संशय
दरम्यान, संजय राऊतांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वबळाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाकरेंची स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा ही आश्चर्यकारक आहे. निवडणुका अजून घोषित झालेल्या नाहीत. ठाकरेंची ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याची तर नाही ना, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.