Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई; सातही आरोपींवर मोकाची कारवाई

Devendra Fadnavis' announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींवर ‘मोका’नुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed, 11 January : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी सीआयडीने मोठे पाऊल उचलले आहे. देशमुख खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सातही आरोपींना मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली आहे.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खूनप्रकरणी सीआयडीकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणीतील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. सर्व आरोपी अटक करण्यापूर्वीच सीआयडीने या सातही आरोपींना मोका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत याबाबतची घोषणा केली होती.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी आतापर्यंत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे या सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारी आहे. त्याचा शोध बीडच्या (Beed) स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत..

Santosh Deshmukh
Maharashtra Politic's : महाआघाडीला मोठा धक्का; महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे सेनेची घोषणा

दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान, आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh
Walmik Karad : वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा अडचणीत; रिव्हॉल्वरच्या धाकाने लूट, सोलापुरात फिर्याद दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींवर ‘मोका’नुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. सीआयडीने त्यानुसार पावले उचलत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आज अंमलबजावणी केली. संतोष देशमुख खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सातही आरोपींवर मोका नुसार कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com