Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : संजय राऊत राहिलेले 'आर्थर रोड'मधील बरॅक कोणी बनविले?; राऊतांनी नाव सांगताच सभागृह हास्यात बुडाले

Narkatil Swarg Book News : आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही. आज देशाला अशाच लोकांची गरज आहे. नरकातील स्वर्ग हे पुस्तक राजकीयच आहे. ज्यांना विरोधी पक्षात राहून राजकारण करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावं.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 17 May : खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना खासदार राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगातील अनेक आठवणी सांगितल्या. आर्थर रोड तुरुंगात मी कसाबच्या बरॅकमध्ये राहिलो, ते बॅरक कोणी बनविले? त्याचे उत्तर दिल्यानंतर सभागृहात प्रचंड हास्यकल्लोळ उडाला आणि बाहेर आल्यानंतर ते बरॅक कसं होतं? हेही विचारलं, अशी आठवण खासदार संजय राऊत यांनी सांगितली.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मी आर्थर रोड तुरुंगात ज्या कसाबच्या बरॅकमध्ये राहिलो, ते बरॅक आमच्या जयंत पाटील यांनी बनवले होते. आता काय सांगणार आहे? जयंत पाटील हे गृहमंत्री होते. ते इंजिनिअर आहेत. कसाबसाठी स्पेशल बरॅक कसं असलं पाहिजे, अशी चर्चा असताना त्याचे डिझाईन जयंत पाटील यांनी बनविले होते.

कसाबसाठी बरॅक बनवलं आणि त्यानंतर आम्हाला आतमध्ये पाठवलं. वरून जयंत पाटील (Jayant Patil) पुन्हा मलाच विचारतात की, बरॅक कसं होतं. त्यावर मी का असे विचारले, तर ते म्हणाले ते बरॅक मीच बनविले आहे, हे सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. ‘बरॅक कसं होतं आणि मी बनवलं,’ अशा अनेक गमतीजमती पुस्तकात आहेत, असेही राऊत यांनी नमूद केले.

आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही. आज देशाला अशाच लोकांची गरज आहे. नरकातील स्वर्ग हे पुस्तक राजकीयच आहे. ज्यांना विरोधी पक्षात राहून राजकारण करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावं. महाराष्ट्र गांडू नाही, हे सांगणारे पुस्तक आहे. हुकुमशाहाला कधी ना कधी मातीत गाडलं जातं, असा इशाराही राऊतांनी दिला.

संजय राऊत म्हणाले, नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचे ८० टक्के भाग तुरुंगात लिहून पूर्ण झाला होता. उर्वरीत २० टक्के पुस्तक लिहिण्यासाठी मला दोन वर्षे लागली. आमच्या कुटुंबातील मुलींनी माझ्याकडे आग्रह करून उर्वरीत पुस्तक लिहायला लावले, त्यानंतर मी हे पुस्तक लिहिले आणि शरद तांदळे या नवख्या प्रकाशकाने ते प्रकाशित करण्याचे धाडस दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT