मुंबई

Ajit Pawar News : भेटीगाठी कौटुंबिक, 'मॅचफिक्सिंग' नाही; अजितदादा म्हणाले स्टॅम्प पेपरवर लिहून देतो...

Political News : महायुतीसोबतच लढणार, महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता फेटाळली

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शरद पवार आणि कुटुंबियांसोबत होणाऱ्या गाठीभेटीवरून अजित पवारांवर मॅचफिक्सिंग होत असल्याचा आरोप होत होता. ते शरद पवारांसोबत परत येतील, असे देखील बोलले जात होते. मात्र, आपल्या रोखठोक शैलीत अजित पवारांनी यांनी या सर्व शक्यता फेटाळल्यात. कुठलीही मॅचफिक्सिंग नाही. माझ्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना फसवणार नाही. माझ्या भुमिकेत कुठेही बदल होणार नाही. तस स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवार म्हणाले.

दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे कुटुंबीयांना भेटले. सुप्रिया सुळे यांच्यासोबत भाऊबीज देखील केली. अजित पवारांनी शरद पवारांची (sharad pawar) भेट घेतल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे अजित पवार परत येणाऱ्या या चर्चांना उधाण आले होते. मात्र,अजित पवारांनी कार्यकर्त्यां समोरच याचे स्पष्टीकरण देऊन टाकले. तुम्हाला वाटत असेल की आम्ही एकच आहोत. पण आता आपण पुढे आलो आहेत. आपल्याला कोणालाही फसवायचे नाही. जी भुमिका आपण घेतली त्यात कुठलाही बदल होणार नाही. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.

मित्र पक्षांना दुखवू नका, असा सल्लाच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. काही वाद असतील कुठला पक्ष चुकत असेल तर वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील. वाद वाढवण्या ऐवजी ते मिटवायचे काम करा, अशा सुचनाच अजित पवारांनी दिल्या. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव चर्चेत होते. त्यावरून अजित पवारांनी इंडिया आघाडीची खिल्ली उडवली.

तुम्हीच सांगा की पंतप्रधानासाठी लोक नरेंद्र मोदींना निवडून देतील की खर्गे यांना, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सुचना केली. ही निवडणूक आपण महायुतीतच लढणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता देखील अजित पवारांनी फेटाळली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT