Madhuri Dixit In Politics : पूनम महाजनांच्या मतदारसंघात माधुरी दीक्षितची बॅनरबाजी; भाजपश्रेष्ठींच्या मनात काय?

BJP News : माधुरी दीक्षित हिचे नाव भाजप हायकमांडच्या निकटचे नाव म्हणून ओळखले जाते. कारण, अमित शाह यांनी माधुरी दीक्षित हिच्या घरी भेट दिली होती
Madhuri Dixit
Madhuri DixitSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अभिनेत्री माधुरी दीक्षित ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. त्याला पुष्टी देणारे बॅनर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात लागले आहेत. हा मतदारसंघ भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप माधुरी दीक्षित हिला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. (Madhuri Dixit's banner's in Poonam Mahajan's constituency)

माधुरी दीक्षित हे भाजप हायकमांडच्या निकटचे नाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. कारण, अमित शाह यांनी माधुरी दीक्षित हिच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी मोदी सरकारने केलेल्या कामाचे बुकलेट शाह यांनी माधुरी दीक्षित हिला भेट दिले हेाते. त्या भेटीनंतर माधुरी दीक्षित ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. त्यावर खुद्द माधुरी हिने आणि भाजपकडूनही भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र, माधुरी ही निवडणुकीच्या राजकारणा उतरणार, अशी चर्चा तेव्हापासून रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Madhuri Dixit
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नात आता काही उरले नाही, जरागेंनी आंदोलन संपवावे; राणेंचा सल्ला

साई उत्सवाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित हिचे उत्तर मध्य मुंबईत मतदारसंघात ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. माधुरी हिचे बॅनर किंवा फ्लेक्स हे पहिल्यांदाच प्रचाराच्या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत. हे बॅनर जरी धार्मिक कार्यक्रमाचे असले तरी माधुरी दीक्षित हिची निवडणुकीत उतरण्याची तयारी आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ पूनम महाजन यांचा आहे. या मतदारसंघातून पूनम महाजन दोनवेळा विजयी झाल्या आहेत. सध्याही हा मतदारसंघ भाजपला पोषक मानला जातो. भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचे धक्कातंत्र लक्षात घेता कोणाचीही उमेदवारी निश्चित मानली जात नाही. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतही भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार का?, असा प्रश्न माधुरी दीक्षित हिच्या बॅनरबाजीमुळे उपस्थित होत आहे.

Madhuri Dixit
KDMC Commissioner News : कंत्राटी चालकाने केला आयुक्तांचा पाठलाग; चौकशी करत घेतले फैलावर...

या सर्व घटनांवर भारतीय जनता पक्षाकडूनही अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तसेच, माधुरी दीक्षित हिने भाजप प्रवेश आणि निवडणूक लढविण्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माधुरी दीक्षित ही खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का आणि भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार का?, हा प्रश्न आहे.

Madhuri Dixit
Solapur DCC : मृत संचालकांच्या वारसांनाही पाठविली दोषारोपपत्रे; वारसांनी मागितली मुदतवाढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com